टी-२० विश्वचषकात शनिवारी (०६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात महत्वाचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आठ विकेट्सने विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने या सामन्यापूर्वी खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यांचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोसाठी हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना होता. मात्र, त्याला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्याला या सामन्यात दुखापतही झाली असती, पण तो थोडक्यात बचावला.
सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या ९१ असताना त्यांनी पाच विकेट्स गमावले होते. अशात वेस्ट इंडिज संघ लवकरच सर्वबाद होईल असे वाटत होते. मात्र, कर्णधार कायरन पोलार्डने संघासाठी मोठी खेळी केली आणि संघाने २० षटकात १५७ धावांचा टप्पा गाठला. वेस्ट इंडिजच्या डावाच्या १३ व्या षटकात शिमरॉन हेटमायर बाद झाला आणि आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ब्रावो खेळपट्टीवर आला. कर्णधार कायरन पोलार्डने मात्र मैदानावर त्याचे स्वागत खूपच खराब पद्धतीने केले.
ब्रावो मैदानात आल्यानंतर मिचेल मार्श १५ षटकात गोलंदाजीसाठी आला. मार्शच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पोलार्डने एक स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, तेव्हा नॉन स्ट्राईकवर ब्रावो उभा होता. पोलार्डने मारलेला हा शॉट सरळ ब्रावोच्या दिशेने गेले. त्याने मारलेला हा शॉट खूपच वेगात होता. हा शॉट सरळ ब्रावोच्या दिशेने गेला आणि त्याला हा चेंडू लागला असता, पण त्याने वेळेवर बॅट आडवी लावली आणि तो बचावला. पोलार्डने मारलेला हा शॉट ब्रॉवोच्या बॅटवर लागल्यानंतर त्याची बॅट हातातून सटकली आणि खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CowCorner9/status/1456945712759853061?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1456945712759853061%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-aus-vs-wi-t20-world-cup-dwayne-bravo-falls-after-kieron-pollard-shot-almost-hits-him-bat-flies-away-watch-its-video-3836579.html
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा केल्या. यामध्ये कर्णधार कायरन पोलार्डच्या ४४, इव्हिन लेविस २९ आणि शिमरॉन हेटमायरच्या २७ धावांचे योगदान होते.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य अवघ्या १६.२ षटकात आणि २ विकेट्सच्या नुकसानावर गोठले. यामध्ये सलामीवीर डेविड वॉर्नरच्या ८९ धावांचे आणि मिचेल मार्शच्या ५३ धावांचे महत्वाचे योगदान होते. डेविड वार्नरला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर निवडले गेले. याव्यतिरिक्त जोश हेजलवुडने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंड संघाला मोठा धक्का! रिटायर्ड हर्ट होऊन धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय मैदानातून बाहेर
-वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन ‘या’ ५ खेळाडूंना द्यावी संधी; वीरेंद्र सेहवागने सांगितली नावे
-काय सांगता! राजस्थान रॉयल्सची साथ सोडून संजू होणार ‘या’ संघाच्या ताफ्यात सामील?