टी-२० विश्वचषकातील १६ व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधी संघ एकमेकांसमोर आले होते. पाकिस्तानने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर स्वस्तात बाद होऊन तंबूत परतले आणि कर्णधार विराटने भारताचा डाव सांभाळलेला असताना मैदानावर असे काही घडले, ज्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या दोन्ही सलामीवीरांना संघाची धावसंख्या सहा असेपर्यंत तंबूत पाठवले होते. त्यानंतर भारताचा कर्णधार विराटने डाव सावरण्याचे काम केले. अशातच जेव्हा ड्रिंक ब्रेक झाला, तेव्हा पाकिस्ताचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानने सर्वांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित केले. रिजवान ड्रिंक ब्रेकमध्ये मैदानावरच नमाज पडू लागला.
सामन्यादरम्यान जेव्हा ड्रिंक ब्रेक झाला, तेव्हा खेळपट्टीवर उपस्थित असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली सामन्यातील पुढचे नियोजन करत होता. अशातच पाकिस्तानचा रिजवान मात्र अल्लाहकडे विजयासाठी प्रार्थना करताना दिसला. ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर रिजवानने त्याच्या हातातील ग्लोव्ज आणि डोक्यावरील हेल्मेट काढले आणि गुडघ्यावर खाली बसला. तो मैदानात खाली बसला आणि नमाज पडू लागला. यापूर्वी कोणत्या खेळाडूने मैदानावर असे केले असेल, याची खूपच कमी शक्यता आहे.
रिजवानने सामन्यादरम्यान नमाज पडून असंख्य चाहत्यांची मने जिंकली आहेत. रिजवानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता आहे आण चाहते त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
Rizwan during drinks break #PAKvIND pic.twitter.com/gqyLmLPdsG
— Salman Naseer (@salnaseer) October 24, 2021
दरम्यान, सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रतुत्तरात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार खेळी केली आणि संघाने एकही विकेट न गमावता आणि १३ चेंडू शिल्लक ठेऊन सामन्यात विजय मिळवला. भारतासाठी कर्णधार विराटने ४९ चेंडूत ५७ धावा आणि रिषभ पंतने ३० चेंडूत ३९ धावांची महत्वाची खेळी. पाकिस्तानसाठी सलामीवीर मोहम्मद रिजवानने ५५ चेंडूत ७९ आणि बाबर आजमने ५२ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला सहज विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
होय, हेच ते खलनायक! युवांबरोबर ‘हे’ ५ अनुभवी भारतीय खेळाडू पाकिस्तानपुढे गारद, पराभवास ठरले जबाबदार
अजून कोणी नव्हे तर धोनीनेच केली होती पाकिस्तानच्या भारतावरील विजयाची भविष्यवाणी, व्हिडिओ चर्चेत