टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधी संघ २४ ऑक्टोबरला आमने सामने असणार आहेत. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. पाकिस्तान संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, कारण यापूर्वी विश्वचषकात जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला आहे, त्यामध्ये प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. अशात पाकिस्तान क्रिकेटने या सामन्यापूर्वी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मात्र वेगवेगळ्या आणि मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेटने हा व्हिडिओ सामन्याच्या एक दिवस आधी शेअर केला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम दिसत आहे, व्हिडिओच्या कॅक्शनमध्ये बाबर आजमचा किंग असा उल्लेख करण्यात आला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तर खूपच मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्या चाहत्याने लिहिले आहे की, “भावांनो उद्या जिंका, अल्लाहची शप्पत आहे. जेव्हापासून शुद्धीवर आलो आहे, तेव्हापासून तुम्हाला हारतानाच पाहत आहे.”
क्रिकेट पाकिस्तानने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बाबर आजमचा किंग असा उल्लेख केला असल्यामुळे काही चाहत्यांनी या पार्श्वभूमीवरही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी किंग हा केवळ एमएस धोनीच आहे, असे म्हटले आहे. तसेच काहींनी विराटचा फोटो शेअर करून त्याला किंग म्हटले आहे.
Bhaiyo kal jeet jana Allah da wasta hai jab say hosh sambhalay hain tum logo ko harta hi dekha hai ????
— Emaan (@abayysaalay) October 23, 2021
Why are you naming him king….we already know kohli has been called king kohli from past 5 6 years…I m a big fan of Babar but ye copy paste kyun Karrahe Ho…this is totally idiotic…chutiyaapa hai ye
— ブ :–:-ワニ (@eMnEmV1) October 23, 2021
The only King in the world is @imVkohli #viratkohli#kohli #INDvPAK #ind#kingkohli
But the babar azam also plays nice….— Hero (@yourbrobhai) October 23, 2021
Call him with some other title, Virat Kohli was the King , Virat kohli is the king and and he will always remain as the king
— ???? (@SundarHive) October 23, 2021
https://twitter.com/S_P_Ganesh/status/1451791664092049408
भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तान संघासाठी हा विश्वचषक जास्त महत्वाचा आहे. मागच्या काही काळात पाकिस्तान संघाची जागतिक क्रिकेटमध्ये खूपच नाचक्की झाली आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या संघांनी अचानक पाकिस्तानविरुद्धच्या त्यांच्या मालिका रद्द केल्या आणि त्यानंतर पाकिस्तानमधील असुरक्षित वातावरणाची सर्वत्र चर्चा झाली आहे.
पाकिस्तान संघ विश्वचषकात चांगले प्रदर्शन करून या चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करू इच्छित आहे. विश्वचषकात चांगले प्रदर्शन केल्यामुळे त्यांची जागतिक क्रिकेटमधील छबी पुन्हा चांगली होईल, अशी त्यांनाअपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहितला बाद कसे करावे हे समजत नाही”; पाकिस्तानी गोलंदाजाचा मोठा खुलासा






