टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारतीय संघाला सलग दुसरा पराभव मिळाला आहे. या सामन्यात भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान होते. यापूर्वी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने पराभव पत्करला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताला आठ विकेट्स राखून पराभूत केले आहे. या पराभवानंतर भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. काही नेटकरी कर्णधार विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत. नेटकऱ्यांनी कर्णधार विराटचे एक जुने ट्वीट पुन्हा चर्चेत आणले आहे.
चाहते भारतीय संघाच्या टी२० विश्वचषकातील प्रदर्शनामुळे निराश झाले आहेत आणि खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. अशातच नेटकऱ्यांनी विराट कोहलीने जवळपास १० वर्षांपूर्वी केलेले एक ट्वीट पुन्हा व्हायरल केले आहे. विराटने हे ट्वीट २३ जानेवारी २०११ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिका हारल्यानंतर केले होते. दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील शेवटचा सामना ३३ धावांनी जिंकला होता आणि मालिका ३-२ अशा फरकाने नावावर केली होती.
विराटने या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “पराभवामुळे दु:खी आहे, आता घरी चाललो आहे.”
Sad for the loss 🙁 going home now
— Virat Kohli (@imVkohli) January 23, 2011
न्यूझीलंडविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे भारतीय खेळाडूंवर निशाणा साधत आहेत. विराटचे हे जुने ट्वीट चर्चेत आल्यानंतर एका नेटकऱ्याने विराट आणि जोफ्रा आर्चरची तुलना केली आहे. आर्चर नेहमीच वेगळेगळे ट्वीट करत असतो आणि ते ट्वीट विविध परिस्थितींना अनेकदा लागू होत असल्याने व्हायरल होत असतात.
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकातील त्याचे पहिले दोन्ही सामने गमावले असून ग्रुप दोनच्या गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे भारताला पहिल्या सामन्यात पराभूत केलेला पकिस्तान ग्रुप दोनच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने त्यांचे पहिले तिनही सामने जिंकले आहेत. तसेच न्यूझीलंड संघ दोन पैकी एक सामना जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तान २ सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात शतक करणारा बटलर ८ वा खेळाडू, पाहा यापूर्वी कोणाचा आहे यादीत समावेश
“भारतीय संघाप्रती थोडी मवाळ भूमिका घ्या आणि थोडी सहानुभूती ठेवा”
कठीण काळात पीटरसन उभा राहिला टीम इंडियाच्या पाठीशी; हिंदीत ट्विट करत म्हणाला…