ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने गुरूवारी (15 सप्टेंबर)संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेटने (Pakistan Cricket) त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून याची घोषणा केली आहे. आठव्या टी20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम (Babar Azam) याच्याकडे सोपवले आहे, तर शादाब खान हा उपकर्णधार आहे. 15 सदस्य असलेल्या या संघाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर माजी क्रिकेटपटूने निवडकर्त्यांवर तीव्र नाराजी दर्शवली आहे. त्याला कारणच तसे आहे.
पाकिस्तानचा हा संघ मुख्य संघनिवड अधिकारी मुहम्मद वसीम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडला गेला. यामध्ये मुख्य संघातून विस्फोटक फलंदाज फखर जमान याला वगळले गेले आहे, तर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना न खेळलेल्या खेळाडूला जागा देण्यात आली आहे. तर संघ जाहीर होताच वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने केलेले ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले, ‘चीफ सिलेक्टरची चीप सिलेक्शन.’
chief slector ki cheap selection 😆
— Mohammad Amir (@iamamirofficial) September 15, 2022
झाले असे की, पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज फखर जमान याला मुख्य संघातून बाद केले आहे. तर त्याला राखीव खेळाडूंमध्ये जागा देण्यात आली आहे. फखरला त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे वगळले आहे. त्याने यावर्षी 7 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 13.71च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर केले गेले, असे विधान पुढे येत आहे. तर त्याच्याजागी शाह मसूद याला संघात घेतले आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पणदेखील केलेले नाही. तसेच दिग्गज शोएब मलिक याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
त्याचबरोबर हैदर अली यालादेखील मुख्य संघात जागा दिली आहे. त्याने पाकिस्तानकडून शेवटचा सामना डिसेंबर 2021मध्ये खेळला आहे. तसेच शाहनवाज दहानी याला देखील राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे. त्याने आशिया चषकात भारताविरुद्धच्या सामन्यात दोन षटकार लगावले होते. कदाचित निवडकर्त्यांच्या या निर्णयामुळेच आमीरने हे ट्वीट केले आहे.
आमीरने 2009मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2019मध्ये खेळला होता आणि डिसेंबर 2020मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने कसोटी, वनडे आणि टी20 मिळून 147 सामन्यांमध्ये 259 विकेट्स घेतल्या आहेत.
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू-
फखर जमान, मोहम्मद हरीस, शाहनवाज दहानी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माजी कर्णधाराने नाकाराला क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव, जबरदस्तीने घ्यायला लावतायेत निवृत्ती
BREAKING: टेनिस सम्राटाचा थांबण्याचा निर्णय; रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा
टी20 विश्वचषक: भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपता संपेना! काही मिनिटांतच तिकिटे सोल्डआऊट