---Advertisement---

पाच चेंडूंची ओव्हर? ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यात पंचांकडून झाली मोठी चूक

aus vs afg
---Advertisement---

टी-20 विश्वचषकाच्या मैदानात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) यजमान ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात आमना सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर निसटचा विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून त्यांचा माजी कर्णधार राशिद खान शेवटपर्यंत झुंज देत होता, पण विजय मात्र मिळवू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 168 धावा केल्या. पण यादरम्यान पंचांकडून एक मोठी चूक देखील झाली.

पंचांची ही चूक ऑस्ट्रेलियासाठी चागंलीच महागात पडू शकत होती, पण सुदैवाने संघाने विजय मिळवला आणि हे प्रकरणही पुढे गेले नाही. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य अफगाणिस्तानला गाठता आले नसले, तरी त्यांच्या पराभवाचे अंतर मात्र अजून वाढू शकत होते. कारण ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करताना एक चेंडू खेळण्यासाठी कमी मिळाला. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याने केलेल्या अर्धशतकामुळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

क्रिकेटमध्ये एका षटकात नियमांनुसार सहा चेंडू टाकले जातात. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावातील चौथ्या षटकात सहा ऐवजी पाच चेंडू टाकले गेले. पंचांचे देखील याकडे लक्ष गेले नाही आणि ऑस्ट्रेलियाला एक चेंडू खेळण्यासाठी कमी मिळाला. अफगाणिस्तानचा नवीन उल हक या षटकात गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्या चेंडूवर मिचेल मार्शने एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डेविड वॉर्नरने एक धावा घेतली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला चार धावा मिळाल्या. चौथ्या चेंडूवर फलंदाजांनी तीन धावा घेतल्या, तर पाचव्या चेंडूवर एकही धावा निघाली नाही. त्यानंतर पंचांनी हे षटक संपल्याचे घोषित केले.

सोशल मीडियावर या पाच धावांच्या षटकामुळे सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आयसीसी सारख्या या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा चुका होत असल्यामुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. क्रिकेटच्या सामन्यात एका-एका चेंडूमुळे सामन्याचा निकाल बदलल्याचे आपण याआधी पाहिले आहे. असात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील या सामन्यात देखील हा एक चेंडू निर्णायक ठरू शकत होता. अफगाणिस्तानने जर हा सामना जिंकला असता, तर पंचांवर मात्र मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले असते. कारण अफगाणिस्तानला शेवटच्या दोन चेंडूंवर 11 धावांची आवश्यकता होती. सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाला. विजयापासून अफगाणिस्तान संघ 4 धावा दूर राहिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप टेनिस स्पर्धेत नील केळकर, श्रेया पठारे अंतिम फेरीत 
चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध राशिद खानचा कहर, टी20 विश्वचषकातील ‘हा’ बलाढ्य रेकॉर्ड केला नावावर 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---