भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जागी संघामध्ये मोहम्मद शमी याची वर्णी लागली. 8व्या टी20 विश्वचषक 2022मध्ये शमी भारतीय वेगवान गोलंदाजी फळीची धुरा सांभाळताना दिसणार आहे. मात्र, त्याला बुमराहच्या जागी संघात घेतल्याबद्दल त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे.
खरं तर, मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला आधी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले नव्हते. तो संघाच्या राखीव खेळाडूंमध्ये सामील होता. मात्र, बुमराह दुखापतीमुळे टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) या स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी शमीला ताफ्यात सामील करण्यात आले आहे.
मोहम्मद शमीचे पुनरागमनाबद्दल ट्वीट
मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघात सामील झाला आहे. त्याने ट्विटरवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “पुनरागमनासाठी खूप मेहनत, समर्पण आणि प्रतिबद्धतेची आवश्यकता असते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा प्रवास माझ्यासाठी एका पुरस्कारासारखा आहे. भारतीय संघात पुनरागमन होण्यापेक्षा शानदार दुसरे काहीच नसू शकते. मी विश्वचषकाची वाट पाहत आहे.”
It required a lot of hard work, commitment and dedication to be back but the journey to Australia has been thoroughly rewarding. No better feeling than to be back with #TeamIndia and my boys. Looking forward to the World Cup. pic.twitter.com/K539OYAHzn
— ???????????????????????????????? ???????????????????? (@MdShami11) October 17, 2022
मोहम्मद शमीने नेट्समध्ये विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्यासारख्या फलंदाजांना गोलंदाजीही केली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत शमी गोलंदाजी करताना दिसत आहे. तो शेवटचा भारतीय संघाकडून सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारात टी20 विश्वचषक 2021मध्ये खेळला होता. त्यानंतर तो आता भारतीय संघात सामील झाला आहे. तो नुकताच कोरोनातून बरा झाला आहे. त्याला संघात सामील करण्याच्या मागणी आधीपासूनच होत होती, परंतु सुरुवातीला शमीला स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर बुमराह बाहेर पडला आणि शमीची वर्णी लागली.
भारतीय संघासाठी मोहम्मद शमी खूप मोठी भूमिका पार पाडणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याच्यावरील जबाबदारी वाढली आहे. विशेष म्हणजे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात तब्बल 4 विकेट्स घेऊन आपला दमही दाखवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोटचा पोरगा स्टँड्सवरून कोसळला खाली, बापानेही त्याच्यामागं मारली उडी; टी20 विश्चषकातील व्हिडिओ व्हायरल
गांगुली नव्हेतर ‘या’ या दोघां भारतीयांपैकी एक बनू शकतो आयसीसी चेअरमन; जय शहांकडे दुसरी मोठी जबाबदारी






