भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्मा याच्या खांद्यावर आहे. रोहित भारतीय संघासोबत टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. यादरम्यान त्याने एक मन जिंकणारे काम केले आहे. त्याने 11 वर्षीय मुलाला टी20 विश्वचषकासाठीच्या तयारीदरम्यान नेट्समध्ये बोलावून त्याचा दिवस खास बनवला. या मुलाच्या गोलंदाजीने प्रभावित होऊन रोहितने त्याला ड्रेसिंग रूममध्येही बोलावले आणि नेट्समध्ये गोलंदाजी करण्याची संधीही दिली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
खरं तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत व्हिडिओत दिसणाऱ्या 11 वर्षीय मुलाचे नाव द्रुशील शर्मा (Drushil Chauhan) असे आहे. रोहितने त्याला स्टेडिअममध्ये गोलंदाजी करताना पाहिले होते. रोहितला द्रुशीलची गोलंदाजी खूपच आवडली आणि त्याला ड्रेसिंग रूममध्ये बोलावले. बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत द्रुशील नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना त्याचा अनुभवही शेअर करत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत बीसीसीआयने लिहिले की, “जेव्हा एक 11 वर्षांच्या मुलाने आपल्या सहज ऍक्शनने रोहित शर्माला प्रभावित केले. द्रुशील चौहान याची एका आकर्षक कहाणी, ज्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे लक्ष वेधले आणि त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केली. तसेच, त्याला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये येण्याचे आमंत्रणही मिळाले.” या व्हिडिओला आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, यावर शेकडो कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे.
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
When a 11-year-old impressed @ImRo45 with his smooth action! 👌 👌
A fascinating story of Drushil Chauhan who caught the eye of #TeamIndia Captain & got invited to the nets and the Indian dressing room. 👏 👏 #T20WorldCup
Watch 🔽https://t.co/CbDLMiOaQO
— BCCI (@BCCI) October 16, 2022
द्रुशीलने त्याचा अनुभव शेअर करत सांगितेल की, त्याला इनस्विंग यॉर्कर आणि आऊटस्विंगर चेंडू खूप आवडतो. दुसरीकडे, रोहितने द्रुशीलला विचारले की, त्याला भारताचा प्रवास करायचा आहे का? तसेच राष्ट्रीय संघाकडून खेळायला आवडेल का? याचे उत्तर देत द्रुशीलने म्हटले की, त्याला माहिती नाही की, त्याला भारताचा प्रवास करण्याची वेळ केव्हा येईल.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात
भारतीय संघ 7 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. ऑस्ट्रेलियात भारताने दोन अनधिकृत आणि दोन अधिकृत सराव सामने खेळले आहेत. यानंतर भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक जिंकून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या हरमनप्रीतच्या मनात बसली ‘ही’ छोटी मुलगी, शॉट्स पाहाच
मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू