आठवड्याभरानंतर म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाचा महाकुंभमेळा आयोजित केला जात आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाने उड्डाण केले आहे. भारतीय संघाने एमएस धोनी याच्या नेतृत्वात 2007 सालच्या पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारत या स्पर्धेत एकही ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. मात्र, आता 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारत हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. निवडकर्त्यांनी टी20 विश्वचषक 2022पूर्वी भारतीय संघात दोन घातक गोलंदाजांना सामील केले आहे. ते सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कोण आहेत ते, चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
‘या’ दोघांची झाली भारतीय संघात एन्ट्री
आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात दोन तगड्या खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामध्ये आयपीएल (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya) यांचा समावेश आहे. या दोघांनाही विश्वचषकासाठी भारतीय फलंदाजांना तयार करण्यासाठी नेट गोलंदाज म्हणून ताफ्यात जोडले आहे. दोन्ही खेळाडू घातक गोलंदाजी करण्यात पटाईत आहेत.
आयपीएलमध्ये केली होती धमाल
सीएसके संघासाठी आयपीएल 2022 हा हंगाम कदाचित एक भयंकर स्वप्नासारखाच होता. संघाला या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. मात्र, सीएसकेसाठी मुकेशने दाखवलेल्या प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली होती. त्याचे प्रदर्शन एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात आणखीच बहरले. त्याने आयपीएल 2022 मध्ये 13 सामन्यात 16 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. नेट्समध्ये मुकेश भारतीय फलंदाजांसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
चेतनही भलताच चमकलेला
आयपीएल 2022पूर्वी चेतन सकारिया राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचा. त्यावेळी या युवा खेळाडूने सर्वांनाच प्रभावित केले होते. हे तो चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्यासाठी ओळखला जातो. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळाताना त्याला फार संधी मिळाल्या नाहीत, पण जेवढ्या संधी मिळाल्या, त्याचे त्याने सोने केले. सकारियाने आयपीएलच्या 17 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत.
टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यासाठी भारत प्रबळ दावेदार
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार आहे. भारताकडे रोहित शर्मा याच्यासारखा कर्णधार आहे. तसेच, विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांसारखे खतरनाक फलंदाजही आहेत. अशात भारतीय संघ 15 वर्षांनंतर टी20 विश्वचषक उंचावतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!