---Advertisement---

नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके

On: रविवार, नोव्हेंबर 13, 2022 8:38 PM
Indian-Fan-Nagin-Dance
---Advertisement---

इंग्लंड आणि पाकिस्तान संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघ जिंकावा असे कदाचित प्रत्येक पाकिस्तानी चाहत्याला वाटत होते. मात्र, त्यांच्या या अपेक्षेवर इंग्लंड संघाने पाणी फेरले. इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळत ट्रॉफी आपल्या नावावर केली. इंग्लंडच्या विजयानंतर पाकिस्तानी चाहते खूपच निराश आहेत आणि भारतीय चाहते त्यांना जोरदार ट्रोल करत आहेत. अशात इंग्लंडच्या विजयाने भारतीय चाहते खुश आहेत. तसेच, आता स्टेडिअममध्ये पाकिस्तानी चाहत्यांसमोर भारतीय चाहत्यांचा नागिन गाण्यावरील डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओ
पाकिस्तानच्या पराभवानंतर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, यामध्ये भारतीय चाहते एका पाकिस्तानी चाहत्याजवळ उभे राहून ‘मैं नागिन नागिन’ गाण्यावर डान्स (Indian Fans Nagin Dance) करताना दिसत आहेत. चाहते डान्ससोबतच त्यांची खिल्ली उडवतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये ट्विटरवर युद्ध सुरू झाले आहे.

https://twitter.com/_VishwajitPatil/status/1591756738486992899?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1591756738486992899%7Ctwgr%5E70a7d55218b5ae1f4d8749847b7a3bdc5dd8b8ac%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fpak-vs-eng-main-nagin-nagin-dance-of-indian-fans-pakistanis-fiercely-teased-video-viral%2F86736%2F

पाकिस्तानची फ्लॉप फलंदाजी
अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तान संघ पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. मात्र, त्यांची फलंदाजी पूर्णत: फ्लॉप राहिली. त्यांच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी उभारता आली नाही. पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावा चोपल्या. यावेळी पाकिस्तानकडून शान मसूद (38), बाबर आझम (32), शादाब खान (20), मोहम्मद रिझवान (15), मोहम्मद हॅरिस (8), मोहम्मद नवाज (5), मोहम्मद वसीम (4) आणि इफ्तिखार अहमद (0) यांनी निराशाजनक कामगिरी केली.

हे आव्हान इंग्लंड संघाने 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. पाकिस्तानने पावरप्लेमध्ये 3 विकेट्स घेतल्या. मात्र, यानंतर एकाही गोलंदाजाला बेन स्टोक्स याची विकेट घेता आली नाही. शेवटी पाकिस्तान संघाला या सामन्यात 6 चेंडू शिल्लक ठेवून इंग्लंडने पराभूत केले. (T20 world cup 2022 Pak vs Eng Nagin Nagin Dance of Indian fans pakistanis fiercely teased see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमीफायलमधून बाहेर पडूनही भारत ‘या’ यादीत दुसऱ्या स्थानी, इंग्लंडने ट्रॉफी जिंकून पटकावला तिसरा क्रमांक
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---