---Advertisement---

‘परमेश्वराला आमच्याकडून मेहनत हवीये…’, अंतिम सामन्यात धडक देताच रिझवानची मोठी प्रतिक्रिया

Mohammad-Rizwan
---Advertisement---

बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या टी20 विश्वचषक 2022 पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच पाकिस्तान विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झाला. आता अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजयी संघाशी होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाच्या विजयाचा हिरो यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि कर्णधार बाबर आझम (Babar Azam) राहिला. बाबर आणि रिझवान यांनी 105 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानचा विजय सोपा केला. बाबरने 42 चेंडूत 53 आणि रिझवानने 43 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली.

रिझवानची प्रतिक्रिया
सामन्यानंतर मोहम्मद रिझवान याने विजयासाठी परमेश्वराला धन्यवाद दिला. सामनावीर बनलेल्या रिझवानने म्हटले की, “सुदैवाने हे अर्धशतक उपांत्य सामन्यात आले. बाबर आणि मी संघर्ष करत होतो, परंतु आम्ही जास्त मेहनत घेतली. परमेश्वरालाही आमच्याकडून मेहनत हवी आहे आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आम्हाला पूर्ण विश्वास होता आणि आम्ही लढत राहिलो. जेव्हा आम्ही फलंदाजी करण्यासाठी आलो, तेव्हा आम्ही वेगवान गोलंदाजांविरुद्ध नवीन चेंडू असल्याने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.”

https://twitter.com/Leiebling/status/1590316376933425152?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1590316376933425152%7Ctwgr%5Ec921a6c391e551385ed397b0fedb0c14c6692652%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Ft20-world-cup-2022-pakistan-vs-new-zealand-mohammad-rizwan-statement-after-team-win-allah-tspo-1571900-2022-11-09

रिझवान पुढे म्हणतो की, “जेव्हा पॉवरप्ले संपला, तेव्हा आम्हाला माहिती होते की, मी आणि बाबरपैकी एकाला टिकून फलंदाजी करायची आहे. कारण, ही कठीण खेळपट्टी होती. परमेश्वराने आमची मदत केली. आम्ही स्पर्धेच्या सुरुवातीला चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र, खेळाडूंना विश्वास होता. आम्ही मेहनत घ्यावी आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी परमेश्वराची इच्छा आहे.”

भारत- पाकिस्तान संघात होऊ शकतो अंतिम सामना
अशात अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल. दुसरा उपांत्य सामना ऍडलेड ओव्हल येथे गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर जगभरातील चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची मजा लुटता येईल. भारत आणि पाकिस्तान संघ यापूर्वी 2007च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. (T20 World Cup 2022 pak vs nz Mohammad Rizwan statement after team win)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर अन् रिझवानने भल्याभल्यांना दाखवली आपली ताकद, टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमात बनलेत टेबल टॉपर
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---