ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022मधून मोठी बातमी समोर येत आहे. ही बामती कोरोनाशी संबंधित आहे. ज्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, त्या खेळाडूंनाही या विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार आहे. या बातमीने खेळाडूंना सुखद धक्का दिला आहे.
ऑस्ट्रेलियातील एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीने सांगितले की, स्पर्धेदरम्यान कोणतीही कोविड चाचणी होणार नाही. तसेच, एखादा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार नाही. त्याऐवजी संघाच्या डॉक्टरांना निर्णय घेतली. तसेच, खेळाडूंना कोविडची लागण झाली, तर स्पर्धेत खेळणे ‘योग्य आहे की नाही याचे मूल्यांकन’ करावे. ऑस्ट्रेलियन फेडरल सरकारचे कोविड-19ची लागण झालेल्यांसाठी आवश्यक असलेले अनिवार्य विलगीकरण या आठवड्याच्या सुरुवातीला संपले.
Players who test positive to COVID-19 will be permitted to play #T20WorldCup matches | @LouisDBCameron https://t.co/hTrzT0CVaT
— cricket.com.au (@cricketcomau) October 16, 2022
विशेष म्हणजे, यूएई 2021मध्ये पार पडलेल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकावले होते. त्यावेळी कोरोनाबद्दल खूप कडक निर्णय करण्यात आले होते.
असे असले, तरीही बर्मिंघम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी20चा अंतिम सामना पार पडला होता. यादरम्यान, ताहलिया मॅकग्राला सामन्याच्या सकाळी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, तिची चाचणी करूनही खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.
टी20 विश्वचषक 2022
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील पहिला सामना रविवारी (दि. 16 ऑक्टोबर) नामीबिया विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. या सामन्यात नामीबियाने श्रीलंकेवर 55 धावांनी विजय मिळवला. तसेच, त्यांनी सहयोगी संघ म्हणून श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रचला.
टी20 विश्वचषकासाठीचा ऑस्ट्रेलिया संघ
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघही सज्ज झाला आहे. त्यांचा संघ पुढीलप्रमाणे-
ऍश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेविड, ऍरॉन फिंच (कर्णधार), जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाक ‘क्रिकेटयुद्ध’ होणाऱ्या एमसीजीचा काय आहे इतिहास? कशी आहे आकडेवारी? वाचा सविस्तर
T20WC: पहिल्याच सामन्यात ‘आशिया चॅम्पियन’ ची पोलखोल, नामिबियाचा श्रीलंकेवर मोठा विजय