भारतीय संघाला आगामी टी-20 विश्वचषकात चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे. कारण चाहत्यांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मागच्या वर्षी यूएईत खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाव्हता. विश्वचषक अभियानातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळायचा आहे. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असून भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे पाहिले गेले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी यावर्षीचा टी-20 विश्वचषक खूपच महत्वाचा असणार आहे. याच कारणास्तव विराट स्वतःच्या तयारीत कसलीही कसर सोडत नाहीये. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील यावर्षीच्या विश्वचषकात वादळी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल. कर्णधारपदाला साजेसे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न रोहितचा असेल. मैदानात या दोन्ही खेळाडूंना फलंदाजीचा सराव करताना पाहिले गेले. यादरम्यान दोघांनीही काही मोठे शॉट्सही खेळले.
रोहित उत्कृष्ट पद्धतीने मारला त्याचा आवडता पुल शॉट –
टी-20 विश्वचषकात रोहितच्या नेतृत्वातील संघाकडून चाहत्यांना यावर्षी विजेतेपदाच्या अपेक्षा आहेत. त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. व्हिडिओ सराव सत्रातील असून रोहित त्याचा आवडत्या पुल शॉटचा सराव करत आहे. त्याने हा शॉट खूपच अप्रतिम मारला असून चेंडू मैदानाच्या बाहेरही गेला आहे. हा व्हिडिओ जोरात व्हायरल देखील होत आहे.
Captain Rohit Sharma in full show in the practice session. pic.twitter.com/jytiNCD2SE
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2022
विराटने केला कसून सराव –
तसेच दुसऱ्या एका व्हिडिओत विराट कोहली चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन दोन सराव सामने खेळले, पण विराट मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये सहभागी नव्हता. असे असले तरी, सराव सत्रात मात्र तो चांगलाच घाम गाळत आहे.
Virat Kohli timing the ball so well in the practice session. pic.twitter.com/LjJUkA8eLJ
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2022
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत मायदेशात टी-20 मालिका खेळली आणि जिंकली देखील. आता विश्वचषकात देखील असेच प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. विश्वचषकात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या महत्वाच्या खेळाडूंची कमी संघाला जाणवू शकते. हे दोघेही दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषक खेळत नाहीयेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुखापत ‘या’ तिघांची पाठ काय सोडेना, आयपीएल 2022 नंतर आता यावर्षीचा टी-20 विश्वचषकही नाही खेळणार
सचिनचा अर्जुन ठरलाय गोव्याचा ट्रम्पकार्ड! तीनही सामन्यात बनला संघाचा सर्वात मोठा मॅचविनर