टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे. या सामन्यासाठी दोन्ही कठोर मेहनत घेत आहेत. नुकतेच बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान न्यूझीलंडमध्ये खेळला. त्यांनी न्यूझीलंडचा पराभव करत तिरंगी टी20 मालिका जिंकली आहे, तर दुसरीकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या स्थितीत एकरूप होण्यासाठी 6 ऑक्टोबरलाच भारतातून रवाना झाला.
ऑस्ट्रेलियामध्ये पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकाची सुरूवात 16 ऑक्टोबरपासून होणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपले विचार व्यक्त केले आहेत. त्याने म्हटले की, पाकिस्तान विरुद्ध कोण खेळणार हो सर्वांनाच ठाऊक आहे. त्याचबरोबर त्याने पुढे बोलताना म्हटले की अंतिम वेळी निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही.
रोहितने या पत्रकार परिषदेत म्हटले, “23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी आम्ही चांगली तयारी करणार आहोत. माझा शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयांवर विश्वास नाही. माझ्याकडे पाकिस्तान सामन्यासाठी आधीच माझे अंतिम अकरा तयार आहे आणि त्या खेळाडूंना त्याची माहिती दिली असून त्यांनी उत्तम तयारी करणे गरजेचे आहे.”
भारत 15 वर्षानंतर टी20 विश्वचषक जिंकण्यास आतूर आहे. 2007मध्ये भारताने पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. तसेच रोहितही त्या संघाचा भाग राहिला होता. आता तो यंदाच्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत आहे. या प्रवासाबाबत बोलताना रोहित म्हणाला, “2007 ते आतापर्यंत हा खूप मोठा कालखंड आहे. जेव्हा मला विश्वचषकासाठी निवडले गेले तेव्हा मी कोणत्याच अपेक्षेने गेलो नव्हतो. मी फक्त त्या स्पर्धेचा आनंद घेणार होतो, तो माझा पहिला विश्वचषक होता. जोपर्यंत आम्ही विश्वचष जिंकला नव्हता तोपर्यंत मला काहीही कळत समजत नव्हते. त्या काळच्या खेळाकडे पाहिले तर आता खेळामध्ये अनेक बदल झाले आहेत.”
“त्याकाळी 140-150 धावसंख्या उत्तम मानली जात होती. मात्र आता संघ 14-15 षटकातच तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आताचे संघ कोणत्याही परिणामाचा विचार न करता जोखीम पत्करतात. आम्हीही आमचा खेळ उंचावण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असेही रोहितने पुढे म्हटले आहे.
पाकिस्तान विरुद्धचा हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022: अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच फेव्हरेट! आकडेवारीच आहे भन्नाट
‘असं नाहीये…’, गांगुलींविषयीच्या चुकीच्या बातम्यांवर बीसीसीआय अधिकाऱ्यानेच लावला पूर्णविराम