---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला मिळवायचंय टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलचे तिकीट, ‘ही’ आहेत 3 समीकरणे

On: गुरूवार, नोव्हेंबर 3, 2022 8:46 PM
Australia-Cricket-Team
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा महाकुंभमेळा जोमात सुरू आहे. या विश्वचषकातील सुपर 12 फेरी अत्यंत रोमांचक झाली आहे. यातील शेवटचे काही सामने शिल्लक आहेत, परंतु अद्याप उपांत्य सामन्यात एन्ट्री करणारे 4 संघ निश्चित झाले नाहीयेत. अशात दुसऱ्या गटातून भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांनी अंतिम चारकडे पाऊले टाकली आहेत. तसेच, पाकिस्तान आणि बांगलादेश संघांच्या आशा अजूनही कायम आहेत. याव्यतिरिक्त पहिल्या गटातील संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघांचे 5-5 गुण आहेत. तसेच, श्रीलंकाही 4 गुणांवर आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर संघ तीन समीकरणातून जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांना श्रीलंका आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट आले आणि सामना रद्द झाला. तसेच, पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध संघाला 89 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे यजमान संघाचा नेट रनरेटही निगेटिव्हहून पॉझिटिव्ह झाला नाहीये. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा नेट रनरेट -0.304 आहे, त्यामुळे संघ गुणतालिकेत अजूनही तिसऱ्याच स्थानी आहे. मात्र, 3 समीकरणे आहेत, ज्यांच्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकतो.

ऑस्ट्रेलिया या तीन समीकरणामुळे मिळवू शकतो उपांत्य सामन्यात जागा
पहिले समीकरण-

ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला पराभूत करत 7 गुण मिळवावे लागतील. तसेच, श्रीलंका संघाने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याची आशा करावी लागेल.

दुसरे समीकरण
जर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकला, तर अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तसेच, इंग्लंडपेक्षा चांगला नेट रनरेट करावा लागेल, ज्यामुळे दोन्ही संघ 7-7 गुणांवर असतील. तसेच, अंतिम निर्णय नेट रनरेटच्या आधारे ठरवला जाईल.

https://www.instagram.com/p/CkfA6oQLdHP/?utm_source=ig_embed&ig_rid=bbfd67eb-58ba-411c-8c4c-e2cb285094cd

तिसरे समीकरण
अफगाणिस्तानविरुद्ध विजय आणि इंग्लंडनेही श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला, तर अशी अपेक्षा करावी लागेल की, आयर्लंड संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा. जेणेकरून न्यूझीलंडचे 5 गुणांवरच राहील आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम चार जागा बनवतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीची दक्षिण आफ्रिकी तोफ भारतात दाखल! कारणही तितकंच खास
भारताकडून टी20 विश्वचषकात विराटच करतोय सर्वाधिक धावा; गंभीर, रैना अन् रोहितही मागेच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---