आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 11वा सामना आज (6 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जात आहे. हा सामना ग्रँड प्रेरी स्टेडियमवर रंगणार आहे. पाकिस्तान संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिलाच सामना खेळत आहे, तर यजमान अमेरिका या विश्वचषकातील दुसरा सामना खेळत आहेत. पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझमच्या (Babar Azam) हाती आहे. अमेरिकेन टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पाकिस्तान- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर झमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ
युनायटेड स्टेट्स अमेरिका- स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (कर्णधार/यष्टीरक्षक), अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान
पाकिस्ताननं शेवटच्या टी20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती. पाकिस्तान संघ पहिल्या टप्प्यात धडपडला होता. सर्वांना वाटत होतं की पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडेल. पाकिस्तान संघानं जोरदार पुनरागमन केलं आणि टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. परंतु पाकिस्तान संघाला इंग्लंडनं फायनल सामन्यात पराभूत करुन टी20 विश्वचषक जिंकण्याच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या होत्या. आता यंदाच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान कशा प्रकारे कामगिरी करेल यावरती देखील लक्ष्य असणार आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघ टी20 विश्वचषकात कधीही आमनेसामने आले नाहीत. प्रथमच पाकिस्तान आणि अमेरिका हे संघ एकमेकांविरुद्ध भिडत आहेत. तर यंदाच्या टी20 विश्वचषकात अमेरिकेनं पहिल्याच सामन्यात कॅनडा संघाचा धुव्वा उडवून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2024 मध्ये फ्लाॅप, टीम इंडीया मध्ये येताच परतला फाॅर्म!
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, रिकी पाँटिंगन केलं भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार का दुसऱ्या मैदानावर? जाणून घ्या एका क्लिकवर