आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध (5 जून) रोजी आहे. हा सामना नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर रंगणार आहे. भारतीय संघापुढं पहिल्याच सामन्यात आयर्लंड संघाचं आव्हान आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी अजून स्पष्ट केलं नाही की, पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामीला कोण येणार?
परंतु भारतीय संघाच्या अनेक माजी खेळाडूंना वाटतं आहे की, रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) भारतीय संघासाठी सलामी दिली पाहिजे. त्यामध्ये भारताचा माजी खेळाडू सरनदीप सिंग (Sarandeep Singh) यांच वक्तव्य समोर आलं आहे. त्यांना वाटत आहे की भारतासाठी विराट कोहलीनं सलामीला आलं पाहिजे. भारतीय संघातून सलामीला कोण येणार? यावरती चर्चा सुरु आहेत. निवडकर्त्यांनी अजून याची घोषणा केली नाही.
विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल 2024च्या हंगामात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुकडूनं (RCB) सलामीला आला होता. त्यानं आयपीएलच्या हंगामात उत्कृष्ट फटकेबाजी केली. कोहलीनं आरसीबीसाठी सलामीला येऊन 15 सामन्यात 741 धावा ठोकल्या. यादरम्यानं त्याचं स्ट्राईक रेट 154.70 राहिलं आहे. परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारताच युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करु शकले नाहीत.
भारतीय संघाचा माजी खेळाडू सरनदीप सिंग एएनआयशी बोलताना म्हणाले, मी खूप दिवसांपासून म्हणत आहे की, विराट कोहलीनं रोहित शर्मासोबत सलीमीला आलं पाहिजे. कारण भारतीय संघाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) त्याच्या सर्वश्रेष्ठ फाॅर्ममध्ये नाही. यादरम्यानं कोहलीनं सलामीला आलं पाहिजे. कोहली सलामीला येऊन पहिल्या काही षटकात चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा करु शकतो आणि शेवटपर्यंत खेळू शकतो. विराट जर सलामीला आला तर सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वरच्या फळीत फलंदाजी करेल.”
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाची ट्रॉफीपेक्षा ‘या गोष्टीवर’ जास्त भर! राहुल द्रविडने केली खुलासा
सुनील गावसकरांनी निवडली, भारतीय संघाची प्लेइंग 11
हे दोन संघ टी20 विश्वचषकात टीम इंडियासाठी ‘घातक’ अद्याप, एकही सामना जिंकण्यात अयशस्वी!