T20 World Cup 2024 : मोहम्मद शमी सध्या आहे तरी कुठे, हा प्रश्न काही जणांना पडला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. कारण मोहम्मद शमीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता मोठा धक्का बसला आहे. य़ाआधी मोहम्मद शमीने वनडे वर्ल्ड कप चांगलाच गाजवला होता. त्यामुळे शमी हा भारतासाठी किती महत्वाचा आहे, हे सर्वांनाच समजून चुकले होते. पण वनडे वर्ल्ड कपनंतर शमीला दुखापत झाली. त्यामुळे शमी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही जाऊ शकला नाही. तर आतापर्यंत शमी वर्ल्ड कपनंतर एकही सामना खेळू शकलेला नाही.
अशातच बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोहम्मद शमीच्या आयसीसी टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. तर वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमी खेळणार नाही. याबाबतची माहिती खुद्द जय शहा यांनी दिली आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोहम्मद शमीच्या रूपात मोठा धक्का बसला आहे.
याबरोबरच काही दिवसांनी आता आयपीएल सुरु होणार आहे. पण शमी आता आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आयपीएलनंतर आता टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. शमी आयपीएल खेळणार नसला तरी तो टी-20 वर्ल्ड कपसाठी तरी फिट होईल, अशी आशा सर्वांना होती. पण नुकतीच शमीच्या पायावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून यानंतर शमीला 3-4 महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
Jay Shah said "Mohammed Shami is likely to return for the Bangladesh series". [PTI] pic.twitter.com/yTVDpr5p3g
— Johns. (@CricCrazyJohns) March 11, 2024
दरम्यान, शमीने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या जेतेपदात मोलाची भूमिका साकारली होती. शमी सातत्याने भेदक गोलंदाजी करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शमी दोन्ही बाजूंना चेंडू स्विंग करू शकतो. त्यामुळे शमी जर वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळणार नसेल तर त्याची उणीव नक्कीच भारतीय संघाला भासणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने शमीच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची अनसा प्रश्न सर्वांन समोर निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- महत्वपूर्ण लढतीत मुंबई शहरने रायगड संघावर विजय मिळवत प्रमोशन फेरीत प्रवेश
- IPL 2024 : मोठी बातमी! RCB च्या सामन्यांचे वेळापत्रक बदलणार, बंगळुरूमध्ये ऊद्भवली मोठी समस्या