आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC t20 world cup) दुसरा सामना (2 जून) रोजी वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) यांच्यामध्ये खेळला गेला. प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना रंगला होता. वेस्ट इंडीजनं या सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघानं 8 गडी गमावून 136 धावसंख्या केली होती. वेस्ट इंडीजसमोर मात्र 137 धावांच लक्ष्य होतं.
वेस्ट इंडीजनं नाणेपेक जिंकून पापुआ न्यू गिनी संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. परंतु पीएनजी संघाची सुरुवात खूप खराब झाली. पीएनजी संघाच्या 94 धावांवरती 5 विकेट्स गेल्या होत्या. परंतु संघ अडचणीत असताना अष्टपैलू खेळाडू सेसे बाबूनं 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्या जोरावर पीएनजी संघानं 137 धावांच लक्ष्य वेस्ट इंडीजसमोर ठेवलं होत. तर वेस्ट इंडीजसाठी अनुभवी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलनं 2 बळी घेतले सोबतच अल्झारी जोसेफनंदेखील 2 बळींची कमाई केली.
धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजकडून रोस्टनं चेसनं (Roston Chase) 47 चेंडूत 4 चौकांरासह 2 षटकारांच्या मदतीनं 42 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. तर ब्रँडन किंगनं 29 चेंडूत 34 धावा आणि निकोलस पूरन 27 चेंडू 27 धावा यांच्या जोरावर वेस्ट इंडीजन हा सामना 5 गडी राखून जिंकला. पीएनजीसाठी कर्णधार असाद वालानं सर्वाधिक 2 बळी घेतले. परंतु पीएनजीला या सामन्यात विजय मिळवता आला नाही.
वेस्ट इंडीज संघ एकवेळी अडचणीत सापडला होता. परंतु रोस्टनं चेसनं (Roston Chase) एका बाजूनं झुंज देत हा सामना वेस्ट इंडीजकडे झुकवला आणि रसेलनं (Andre Russell) 18.6च्या चेंडूला 1 धाव घेऊन वेस्ट इंडीज संघाला विजय दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजच्या भेदक माऱ्यापुढे पापुआ न्यू गिनी संघ गार, वेस्ट इंडीजसमोर 137 धावांच आव्हानं!
निकोलस पूरनला ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी!
वेस्ट इंडीजनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11