---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात या स्टार खेळाडूला मिळालं ‘सर्वोत्तम क्षेत्ररक्षकचा’ पदक

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत-इंग्लड सामन्यात टीम इंडियाने 68 धावांनी शानदार विजय मिळवला आहे.
सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी केली. या सामन्यात रिषभ पंतच्या क्षेत्ररत्रणाच्या जोरावर त्याला भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या हस्ते ‘बेस्ट फ्लिडरचा’ मेडल देण्यात आला.

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देत भारतीय संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली. 27 जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात टीम इंडियाने 68 धावांनी एकतर्फी वि़जय मिळवला. या सामन्यात रिषभ पंतने जाॅस बटलरचा शानदार झेल झेलला आणि मोईन अलीला यष्टीचीत केले. त्याच्या या कामगिरीवर भारतीय संघाकडून बेस्ट फ्लिडरचा’ मेडल देण्यात आले आहे. दिनेश कार्तिक कडून रिषभ पंतला हे मेडल देण्यात आले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने शानदार फलंदाजी केली. रोहित शर्मा (57) आणि सूर्यकुमार यादव (47) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 171 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघासमोर ठेवले. प्रत्युतरात धावांचा पाठलाग करायला आलेल्या इंग्लंड संघ भारतीय गोलंदाजीसमोर डगमगला. इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजास आपला डाव आखता आला नाही. संघास मर्यादित 20 षटके खेळता आले नाही. इंग्लंड संघ 16.4 षटकात 103 धावांत सर्वबाद झाला.

रोहित शर्मासह राहुल द्रवीडने केली विराट कोहलीची पाठराखण
“एक अकेला सब पर भारी” अक्षर पटेल फाॅर्मात, इंग्लंड कोमात
टीम इंडिया फायनलमध्ये पोहचताच कर्णधार रोहित शर्मा भावूक, कोहलीनं सावरंल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---