आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 19वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला गेला. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानवर गोलंदाजीचा भेदक मारा केला. पाकिस्तानसमोर अवघ्या 120 धावांचं आव्हान होतं. परंतु भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान संघ ढेपाळला. भारतानं 6 धावांनी पाकिस्तानला धूळ चारली आणि गुणतालिकेत शीर्ष स्थानी मुसंडी मारली.
तत्पूर्वी भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान एक नो-बाॅल टाकल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. सिराजन पाकिस्तानला 17 चेंडूत 29 धावांची गरज असाताना नो-बाॅल फेकला. कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 18वं षटक टाकण्याची जबाबदारी सिराजकडे दिली होती यादरम्यान त्यानं दुसराच चेंडू नो फेकला. त्याच्या षटकात 9 धावा आल्या.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) काॅमेंट्री करत असताना म्हणाले, “हे अक्षम्य आहे. प्रोफेशनल क्रिकेटर्स नाहीतर तुम्ही कोणीपण असूदे तुम्ही नो-बाॅल फेकू शकत नाही. वाईड चेंडू टाकणं तुमच्या नियंत्रणात नसतं, परंतु नो-बाॅलचं नियंत्रण तुमच्या हातामध्ये आहे. यासाठी कोणतीही माफी नाही.” सिराजच्या नो-बाॅलचा पाकिस्तानला फारसा फायदा झाला नाही. कारण फ्री-हिटच्या चेंडूवर इफ्तिखार अहमद केवळ दोनच धावा बनवू शकला.
पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) 4 षटक फेकून मात्र 19 धावा दिल्या. यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. परंतु त्याचे चारही षटक भारतासाठी खूप महत्वाचे ठरले. भारताला विजय मिळवून देण्याचा खरा मानकरी भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
राखीव खेळाडूंनी लूटला चाहत्यांप्रमाणेच भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद
पाकिस्तानच्या ‘सुपर 8’ मध्ये क्वालिफाय होण्याच्या आशा अजूनही जिवंत!
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्याने विकले चक्क ट्रॅक्टर, हाती मात्र निराशाच