आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 19 वा सामना आज (9 जून) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) नेहमीच चर्चा होत असते. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अलीनं (Azhar Ali) विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीची क्रेझ नेहमीच पाहायला मिळत असते. पाकिस्तानचे कित्येक चाहते कोहलीच्या नावाचा जल्लोष करताना पाहायला मिळतात. पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली (Azar Ali) म्हणाला, “विराट कोहली (Virat Kohli) जर लाहोरमध्ये एक सामना खेळला तर त्या मैदानावरचं वातावरण वेगळंच पाहायला मिळेल. सर्व मैदान हिरव्या रंगाच्या जर्सीनं भरेल, परंतु जर्सीच्या पाठीमागं बाबर आझम किंवा शाहीन आफ्रिदीचं नाव नसून कोहलीचं नाव असेल, तेसुद्धा त्याच्या 18 नंबरसहित.”
अझर अलीनं हेसुद्धा सांगितलं की जेव्हा विराट कोहली चांगल्या फाॅर्ममध्ये नव्हता, त्यावेळी मी प्रार्थना करत होतो की तो लवकर फाॅर्ममध्ये परतावा. अझर अली म्हणाला, “जेव्हा कोहली फाॅर्ममध्ये नव्हता त्यावेळी मी कित्येकवेळा त्याच्यासाठी प्रार्थना केली की, अल्ला त्याला धावा बनववू दे. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. परंतु मला माहित नाही की, मी तीन वर्ष हे का केलं?”
यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात कोहली फक्त एकच धाव करु शकला होता. परंतु टी20 विश्वचषकाच्या इतिहासात कोहलीची पाकिस्तानविरुद्ध आकडेवारी खूप शानदार आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्ध टी20 विश्वचषकात 5 सामन्यात 4 अर्धशतक ठोकले आहेत. यादरम्यान कोहलीनं 308 धावा कुटल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा जाहीर, 20 दिवस चालणार स्पर्धा
मोहम्मद आमिर विरुद्ध रोहितची बॅट शांतच, विराटही खेळतो सांभाळून; आकडेवारी धक्कादायक!
खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद