टी20 विश्वचषक 2024 चा 40 वा सामना अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट लुसिया येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरन यानं एक मोठा रेकॉर्ड बनवला. त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी करत अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह उमरझईच्या ओव्हरमध्ये चक्क 36 रन ठोकले!
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं पाचव्यांदा घडलं आहे, जेव्हा एखाद्या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये 36 धावा ठोकण्यात आल्या. निकोलस पूरननं ओमरझईच्या या ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले. बाकीच्या धावा वाईड आणि नो-बॉल द्वारे आल्या.
अजमतुल्लाह उमरझई डावाचा चौथा आणि त्याचा दुसरा ओव्हर टाकण्यासाठी आला होता. तोपर्यंत निकोलस पूरन अगदी शांत होता. तो 2 चेंडूत 1 धाव करून क्रीजवर होता. मात्र उमरझई गोलंदाजीला येताच त्यानं आपला गियर बदलला. त्यानं ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. यानंतर उमरझईनं नो-बॉल टाकला, ज्यावर चौकार आला. फ्री हिटवर ओमरझईनं बाऊंसर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या वरून चौकारासाठी गेला.
पुढच्या चेंडूवर पूरन बोल्ड झाला, मात्र ही फ्री हिट होती. यानंतच्या चेंडूवर लेग बायच्या रुपात आणखी एक चौकार आला. यानंतर निकोलस पूरननं एक चौकार आणि आणखी दोन षटकार लगावले. अशाप्रकारे अझमतुल्लाह उमरझईच्या षटकात 36 धावा बनल्या. यासह निकोलस पूरननं युवराज सिंग आणि कायरन पोलार्डसारख्या दिग्गजांची बरोबरी केली आहे.
युवराज सिंगनं 2007 टी20 विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये 36 धावा ठोकल्या होत्या. तर कायरन पोलार्डनं 2021 मध्ये अकिला धनंजयच्या ओव्हरमध्ये 36 धावा हाणल्या होत्या. याशिवाय नेपाळच्या दीपेंद्र सिंह ऐरी यानं कतारच्या कामरान खान विरुद्ध एका षटकात 36 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“तिथे तुमचा वेळ वाया घालवू नका, भारतात परत या”, हरभजन सिंगचा पाकिस्तानी प्रशिक्षकाला सल्ला
आश्चर्यकारक! लाॅकी फर्ग्युसननं रचला इतिहास, टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
टी20 विश्वचषकादरम्यान गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट