आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 22वा सामना आज (11 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. कॅनडाचा संघ या सामन्यात उलटफेर करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी कॅनडा संघात भारतीय वंशाचे जास्त खेळाडू आहेत. ज्यामध्ये पंजाबी खेळाडूंची संख्या जास्त आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की, त्यांना पंजाबी बोलणं सुद्धा खूप महागात पडतं.
कॅनडाच्या संघात त्यांच्या वंशाचे देखील खेळाडू आहेत. कॅनडा अशा संघांपैकी एक संघ आहे, ज्यामध्ये खूप वेगवेगळ्या वंशाचे खेळाडू आहेत. त्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि कॅरेबियन वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे. परंतु याच कारणास्तव व्यवस्थापनानं सर्व खेळाडूंना इंग्रजी बोलणं आवश्यक ठेवलं आहे. त्यालाही एक कारण आहे. प्रत्येकाला त्याच्या भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. परंतु जेव्हा संघातील दोन किंवा अधिक खेळाडू असं करतात आणि इतर खेळाडूंना ती भाषा समजत नाही. त्यामुळं संघात अडचणीचं वातावरण निर्माण होेतं.
त्यामुळे संघाचं वातावरण खराब होऊ नये यासाठी व्यवस्थापनानं पंजाबी बोलणाऱ्या खेळाडूंवर दंड लागू केला आहे. कॅनडामध्ये सहभागी खेळाडू नवनीत धालीवाल क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, “आमच्या तोंडातून साधा पंजाबी शब्द जरी निघला तरी ते आमच्यासाठी खूप अवघड आहे. कारण आम्ही सतत दंड भरत राहतो.” कॅनडाच्या संघात नवनीत धालीवाल, परगट सिंग, रवींद्र पाल सिंग, दिलप्रीत बाजवा, कलीम सना हे खेळाडू पंजाबी बोलतात.
कॅनडा संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात पहिला सामना गमावला होता. अमेरिकेनं पहिल्या सामन्यात त्यांचा पराभव केला. परंतु कॅनडा संघानं दुसऱ्या सामन्यात उलटफेर करत आयर्लंडचा धुव्वा उडवला. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सर्वाधिक धावा ठोकणारा संघ कॅनडा आहे. त्यामुळे पाकिस्तानला कॅनडाविरुद्ध खेळताना दबाव असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिसमध्येही एमएस धोनीची क्रेझ! चाहता भेटता क्षणीच पडला पाया
यांच्यासाठी वय हा फक्त आकडा! टी20 विश्वचषकातील 4 सर्वात वयस्कर खेळाडू, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे
एक पराभव अन् पाकिस्तानचं काम तमाम! कॅनडाविरुद्ध आज ‘करो या मरो’ सामना खेळणार बाबर सेना