---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपपूर्वी कांगारुंना मोठा धक्का, पॅट कमिन्स स्पर्धेबाहेर; संघात दोन मोठे बदल

On: शनिवार, जानेवारी 31, 2026 2:08 PM
---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यास आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले असतानाच ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. कमिन्सला पाठदुखीची जुनी समस्या असून तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. ऑस्ट्रेलियन संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती आणि पुनर्वसनाचा सल्ला दिला आहे.

कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने बेन ड्वारशुइसला 15 सदस्यीय संघात स्थान दिले आहे. कमिन्सचा अनुभव आणि वेगवान मारा संघासाठी महत्त्वाचा होता, त्यामुळे त्याचे वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे कांगारू संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघात आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू मॅथ्यू शॉर्टला संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या मॅट रेनशॉ याला संधी देण्यात आली आहे. तसेच अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ यालाही या वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळालेले नाही.

दिलासादायक बाब म्हणजे जोश हेजलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस हे तिघेही वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले आहे. हेजलवूड अ‍ॅशेस मालिकेपूर्वी हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर होता. टिम डेव्हिड हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बिग बॅश लीग आणि पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळू शकला नव्हता. तर नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बीबीएल फायनल आणि पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर होता.

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनॉली, टिम डेव्हिड, बेन ड्वारशुइस, कॅमरन ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनमॅन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅडम झाम्पा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---