---Advertisement---

टी20 वर्ल्डकपच्या तिकीट विक्रीत चाहत्यांची भारतानंतर ‘या’ संघाला पसंती! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका नसून भलताच

On: गुरूवार, जानेवारी 29, 2026 1:21 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वात वरिष्ठ पुरूष संघाचा टी२० विश्वचषक येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहे. यातील पहिला सामना ७ फेब्रुवारीला पाकिस्तान-नेदरलॅंड्स यांच्यात कोलंबो येथे रंगणार आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होत असल्याने अर्थातच गतविजेत्या भारताच्या सामन्यांच्या तिकीटाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. यामुळे तिकीट विक्रीमध्ये भारताचा संघ पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर असलेला संघ चकीत करणारा आहे.

मायदेशात ही स्पर्धा असल्याने भारतीय चाहते त्याच्यासाठी आतुर आहेत. या स्पर्धेतील भारतानंतर अधिक तिकीट कोणत्या संघाच्या सामन्यांची विकली गेली असेल हे जाणून तुम्हाला धक्काच बसेल. या स्पर्धेच्या तिकीट विक्रीमध्ये प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका यांना नाहीतर नेपाळ संघाला भारतानंतर सर्वाधिक पसंती दिली आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, टी२० विश्वचषक२०२६ च्या तिकीट विक्रीमध्ये भारतानंतर नेपाळ संघाच्या सामन्यांचे तिकीट मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.

या विश्वचषकात नेपाळचा संघ गट क (सी) मध्ये आहे. या गटामध्ये वेस्ट इंडिज, इ्ंग्लंड, इटली आणि बदली संघ स्कॉटलंडचा समावेश आहे. या स्पर्धेतील नेपाळच्या सामन्यांचे ठिकाण पाहिले तर तिकीट विक्रीच्या मागचे आश्चर्य समोर येईल. नेपाळचे सर्व साखळी सामने मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

तिकीटांची विक्री पाहून नेपाळमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचे अधिक चाहते सामन्यांसाठी स्टेडियममध्ये दिसणार आहे. यावरून नेपाळमध्ये क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे.

नेपाळ या स्पर्धेत पहिला सामना ८ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध, १२ फेब्रुवारीला इटलीवविरुद्ध, १५ फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध आणि १७ फेब्रुवारीला स्कॉटलंडविरद्ध खेळणार आहेत. या स्पर्धेत नेपाळच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित पौडेल याच्यावर आहे.

टी२० विश्वचषक २०२६साठी नेपाळचा संघ– रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी (उपकर्णधार), संदीप लामिछाने, कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), संदीप जोरा, आरिफ शेख, बसीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला, लोकेश बाम (विकेटकीपर).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---