---Advertisement---

भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यापूर्वी पाकिस्तानचा गेम प्लॅन, ‘हा’ फलंदाज आझमसोबत करणार ओपनिंग

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 2:30 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१, ही स्पर्धा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावदी उरला आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट संघ टी२० विश्वचषकाच्या तयारीला लागला आहेत. काही संघांनी तर आतापासून रणनिती आखण्यास तयार केली आहे. या स्पर्धेचा आयोजक भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या टी२० विश्वचषक अभियानाचा शुभारंभ करेल. दुबईच्या दुबई क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगेल. तत्पूर्वी भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने ‘माइंड गेम’ खेळण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच एका मुलाखतीत त्याने पारंपारिक विरोधक भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० विश्वचषक सामन्यात त्यांची सलामी जोडी कशी असेल?, याबाबत खुलासा केला आहे. पाकिस्तानच्या टी२० संघाचा उपकर्णधार मोहम्मद रिझवान हा आपल्यासोबत सलामीला उतरणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

आझम म्हणाला की, “आमचे मनोबल उंचावलेले आहे आणि आम्ही भारताविरुद्धचा पहिला सामना जिंकत स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करू इच्छित आहोत. कोणत्याही स्पर्धेत सुरुवातीला लयीत येण्यासाठी संघाचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असते. मी टी२० विश्वचषकादरम्यान रिझवानसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी जाईल. पण परिस्थितीनुसार आमच्या या योजनेत बदलही होऊ शकतो. यासाठी मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक या अनुभवी खेळाडूंची आम्हाला मदत होईल.”

पाकिस्तानच्या खेळाडूंनी युएईच्या मैदानांवर बरेच क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्यांना येथील मैदानांचा दांडगा अनुभव असल्याचे आझमचे म्हणणे आहे. याच धर्तीवर पाकिस्तानचा संघ प्रतिद्वंद्वी भारताला पराभूत करेल, असा विश्वास असल्याचे आझमने म्हटले आहे.

“आम्हाला माहिती आहे की, युएईतील खेळपट्टी कशा असतील आणि फलंदाजांना तेथे कसे सामंजस्य बसवावे लागले. सामन्यादिवशी जो संघ चांगला खेळेल तोच संघ जिंकेल. मला तर वाटते की, आम्हीच हा सामना जिंकू. आम्हाला दबावाची जाणीव आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, आम्ही हा सामना जिंकत लयीत येऊ. भूतकाळात झालेल्या गोष्टींचा आम्ही जास्त विचार करत नाही. आम्ही फक्त भविष्याविषयी विचार करतो आणि सद्या त्याचीच तयारी करतो आहोत. संघातील सर्व खेळाडूंनी मायदेशातील क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आम्हाला आशा आहे की, वरिष्ठ खेळाडूंकडून आम्हाला या स्पर्धेत काहीतरी शिकायला मिळेल,” असेही त्याने म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

टी२० विश्वचषकानंतर भारताचा फक्त कर्णधारच नव्हे तर खेळाडूही बदलणार? निवडकर्त्यांची ‘युवा’ क्रिकेटर्सवर नजर

राहुल की ऋतुराज? कोण उंचावणार आपली पहिली आयपीएल ट्रॉफी; पाहा आतापर्यंतची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---