भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)सज्ज झाला आहे. भारत बरोबर एक वर्षानंतर टी20 विश्वचषक खेळणार आहे. 2021मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सातवा टी20 विश्वचषक दुबईमध्ये खेळला गेला होता. त्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व विराट कोहली याने केले होते, तर ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या स्पर्धेत रोहित शर्मा भारताच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. एखाद्या आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची रोहितची ही पहिलीच वेळ आहे.
या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. या सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याने संघाच्या कर्णधारपादाची जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून कोणकोणते बदल झाले ते सांगितले आहे.
रोहित म्हणाला, “मी जेव्हापासून संघाच्या कर्णधारपद स्विकारले आहे आणि टी20 विश्वचषकत 2021पासून संघात अनेक बदल झाले आहेत. संघ व्यवस्थापकांनी सगळ्यांना आपापले निर्णय घेण्याचे स्वातंत्र दिले आहे. ज्यामुळे आपल्या निर्णयाने काय परिणाम होतात याचा अधिक विचार न करणे आणि त्या निर्णयांना मागे सारणे हे टाळले पाहिजे. तसेच आपला माइंटसेट योग्य असेल तर आपल्याला कशाचेही भय नाही. आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष दिले आहे. ज्यामुळे खेळाडूला चांगली कामगिरी करता येते.
“भारतासाठी खेळणे माझ्यासाठी महत्वाचे असून तो एक सन्मानच आहे, मग तो सामना मी एखादा खेळाडू म्हणून खेळेल किंवा कर्णधार म्हणून,” असेही रोहितने पुढे म्हटले आहे. भारताने 2022च्या हंगामात अनेक टी20 मालिका खेळल्या आहेत. त्यामध्ये निरनिराळे प्रयोग करण्यात आले. ज्यामुळे अनेक सामने आणि मालिकाही भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. टी20 विश्वचषकात आता पाकिस्तानविरुद्ध भारत कसा खेळ करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहितचा हा कारकिर्दीतील आठवा टी20 विश्वचषक आहे. तो 2007मध्ये दक्षिण आफ्रिकेत जिंकलेल्या टी20 विश्वचषकाच्या भारताच्या संघाचा भाग होता. आतापर्यंतचे सगळे टी20 विश्वचषक खेळणारे रोहित आणि बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हे दोनच खेळाडू आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अक्षर अन् अश्विनमध्ये कुणाचं पारडं जड? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी धोनीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ‘मी विश्वचषक खेळत नाहीये’