ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) सुपर 12चे सामने शनिवारपासून (22 ऑक्टोबर) खेळले जाणार आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखील खेळत आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. यामुळे या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. अशातच भारताच्या संघात जसप्रीत बुमराह याच्या जागी मोहम्मद शमी संघात आला. त्याच्या येण्याने मात्र एका खेळाडूची जागा धोक्यात आली आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारताच्या ताफ्यात वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी (Mohammed Shami), हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. तसेच फिरकीपटू म्हणून आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल हे आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारत उत्तम गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. त्यासाठी रणनीती आखली तर वेगवान गोलंदाजांना अधिक संधी आहे. अशात तीन वेगवान गोलंदाज घेतले तर शमीचे नाव पक्के आहे. त्याने टी20 विश्वचषक 2021नंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना न खेळता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्याच्या डेथ ओव्हर्समध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने एक षटक टाकताना एक धावबाद करताना तीन विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे त्याची पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये जागा निश्चित आहे.
शमी संघात आला तर हर्षल पटेल याला बाकावर बसण्याची शक्यता आहे. तसेच संघात भुवनेश्वर, अर्शदीप हे असतील. अर्शदीप हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज जो फलंदाजांना त्रास देऊ शकतो. हर्षलला जागा न मिळण्याचे आणखी एक कारण आहे. त्याने मागील काही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. काही सामन्यांमध्ये तर त्याने सर्वाधिक धावा खर्च केल्या आहेत.
बुमराहच्या आधी अष्टपैलू रविंद्र जडेजा हा टी20 विश्वचषकाला मुकला असल्याने भारताच्या गोलंदाजीवर या स्पर्धेत त्याचा किती परिणाम हे लवकर कळेलच. पाकिस्तानविरुद्ध युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी हे असतील, तर हार्दिक पंड्या हा गोलंदाजीचा पाचवा पर्याय उपलब्ध आहे. तसेच अक्षर पटेल आणि रिषभ पंत यांना पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास मिळेल का हा पण प्रश्न आहे. कारण भारताला तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे असतील तर एकच फिरकीपटू खेळवावा लागेल आणि विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिक उत्तम आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा दसऱ्याच्या दिवशी कुंबळे आणि श्रीनाथने भारताला करून दिले होते विजयाचे सीमोल्लंघन
टी20 विश्वचषकातील आतापर्यंतचे शतकवीर; केवळ एका भारतीयाचा समावेश






