---Advertisement---

टी20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता? जाणून घ्या कोणते संघ अजूनही ट्रॉफीपासून वंचित!

On: मंगळवार, जून 4, 2024 1:39 PM
t20 world cup
---Advertisement---

भारतात 2 जून पासून टी20 विश्वचषक 2024 च्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे. यंदाचे विश्वचषक अमेरिका आणि वेस्टइंडीज या देशात खेळवली जाणार आहे. याआधी 2022 साली झालेल्या टी 20 विश्वचषकात इंग्लंडनी खिताब जिंकला होता. तर टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीत टीम इंडीयने 2007 साली ट्रॉफी आपल्या नावे केली होती. चला तर मग जाणून घेऊया टी20 विश्वात कोणता संघ सर्वाधिक यशस्वी ठरला आहे आणि कोणत्या मोठ्या संघांनी आतापर्यंत ट्रॉफी जिंकली नाही. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड व्यतिरिक्त टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने एकवेळी टी-20 विश्वचषक जिंकला.

2022 पर्यंत टी-20 विश्वचषक विजेत्यांची यादी.
भारत- 2007
पाकिस्तान- 2009
इंग्लंड- 2010, 2022
वेस्ट इंडिज- 2012, 2016
श्रीलंका- 2014
ऑस्ट्रेलिया- 2021

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे टी20 विश्वचषकातील आतापर्यंतचे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे असे संघ आहेत ज्यांनी प्रत्येकी दोनदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. सर्वप्रथम, वेस्ट इंडिजने दोनदा ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर इंग्लंड दोन ट्रॉफी जिंकणारा संघ ठरला. 2012 आणि 2014 विश्वचषकात वेस्ट इंडिजने विजेतेपद पटकावले, तर इंग्लंड 2010 आणि 2022 टी-20 विश्वचषकात चॅम्पियन बनले.

आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बांग्लादेश, झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांनी टी20 विश्वचषक विजेतेपद जिंकलेले नाही. या संघांमध्ये सर्वाधिक नजर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडवर आहे. अशा परिस्थितीत, हे संघ त्यांचे पहिले टी20 विश्वचषक कधी जिंकणार? हे पाहणे मजेशीर असेल.

महत्तवाच्या बातम्या-

हार्दिक पांड्या दमदार पुनरागमनासाठी सज्ज, ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर विरोधी गोलंदाजांचा थरकाप उडेल!
‘भारत-पाक’ सामनाच्या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित! दिग्गजांनी केली खडसून टीका
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील असे 5 सामने ज्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळले गेले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---