---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का! टी२० विश्वचषक गेला भारताबाहेर? युएईसह ‘या’ देशात होणार आयोजन

On: शनिवार, जून 5, 2021 7:08 PM
---Advertisement---

भारतात कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करण्यात आला. आता स्पर्धेचा उर्वरित हंगाम सप्टेबर-ऑक्टोबर या काळात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळण्याचे ठरले. त्याच बरोबर आता भारतात नियोजित आयसीसी टी२० विश्वचषक ही स्पर्धा देखील इतरत्र खेळवण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असून, यासाठी चार ठिकाणांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी होणार स्पर्धा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) १ जून रोजी झालेल्या बैठकीत विश्वचषक आयोजनावर विचार करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत भारतातील परिस्थिती कशी असेल याविषयी कोणी सांगू शकत नाही. आम्ही आयोजन आमच्याकडे ठेवून स्पर्धा दुबई, अबुधाबी, शारजाह व ओमानची राजधानी मस्कत येथे खेळविण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याला सर्वांची संमती आहे.”

प्राथमिक फेरीचे सामने मस्कत येथे खेळले जाऊ शकतात. तसेच, आयपीएल १० ऑक्टोबरपर्यंत संपली तर, मैदान सुशोभीकरण व नव्या खेळपट्ट्या बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्यानंतर विश्वचषक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो.

विश्वचषकाचे आयोजन ढकलले पुढे
यापूर्वी अखेरची टी२० विश्वचषक स्पर्धा २०१६ मध्ये भारतातच आयोजित करण्यात आली होती. २०१८ मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नाही. त्यानंतर २०२० सालातील ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळविली जाणार होती. परंतु, जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. २०२१ मधील स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले. मात्र, आता ही स्पर्धा युएईत होण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अझरुद्दीन यांना आठवला त्यांचा खास स्कूटर; म्हणाले, ‘तो माझ्यासाठी लक्झरी होता’

‘या’ तारखेला होणार आयपीएलचा अंतिम सामना, खेळाडूंच्या काळजीपोटी बीसीसीआयचा निर्णय

‘हा नियम काहीवेळासाठी विराटला लागू होत नाही’, अनुष्काने साऊथॅम्पटनमधील शेअर केलेला फोटो झाला व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---