---Advertisement---

‘हा नियम काहीवेळासाठी विराटला लागू होत नाही’, अनुष्काने साऊथॅम्पटनमधील शेअर केलेला फोटो झाला व्हायरल

On: शनिवार, जून 5, 2021 6:42 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी साऊथॅम्पटन येथे पोहचला आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबासमवेत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली असल्याने बऱ्याच खेळाडूंबरोबर त्यांचे कुटुंबीय इंग्लंडला रवाना झाले आहेत.  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह देखील त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा व मुलगी वामिका इंग्लंडला पोहचले आहेत. दरम्यान साऊथॅम्पटन येथे पोहचल्यानंतर अनुष्काने शेअर केलेल्या एका फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सध्या भारतीय खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय साऊथॅम्पटन येथील एजेस बाऊल स्टेडियमजवळ हॉटेलमध्ये ३ दिवसांसाठी क्वारंटाईन झाले आहेत. त्यानंतर खेळाडूंना सरावासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यावेळी अनेक क्रिकेटपटूंनी साऊथॅम्पटनला क्वारंटाईन झाल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान, अनुष्काने देखील तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मागे एजेस बाऊल स्टेडियम दिसत आहे. तसेच तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘काम घरी आणू नये हा नियम काहीवेळासाठी विराटला लागू होत नाही.’ अनुष्काच्या या फोटोवर तिच्या आणि विराटच्या चाहत्याने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPu1oObpGoG/

वामिकाबरोबरचे फोटो व्हायरल
या इंग्लंड दौऱ्यावर येताना विमानतळावर अनुष्काने पापाराजींना पाहून वामिकाला छातीशी घट्ट धरल्याचेही दिसले होते. यादरम्यानचे अनेक फोटो व्हायरल झाले. खरंतर विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीची झलक इतक्यात दाखवण्यास नकार दिला आहे.

विराटने सांगितले होते जोपर्यंत वामिकाला सोशल मीडिया काय आहे, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत ते तिला सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहेत. त्यामुळे वामिकाची एक झलक पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. वामिकाचा जन्म यावर्षीच्या सुरुवातील ११ जानेवारी रोजी झाला आहे.

असा असेल भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
भारतीय पुरुष संघाला न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जूनदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्पटन येथे खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

असे आहे संपूर्ण वेळापत्रक
कसोटी अजिंक्यपद
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथॅम्पटन

कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर

महत्त्वाच्या बातम्या – 

बंधुप्रेम! छोट्या भावाची मोठ्या भावाकडून तोंडभरुन स्तुती, पाहा काय म्हणाला

मोठा झटका! ‘या’ कारणामुळे भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक टोकियो ऑलम्पिकमधून निलंबित

बाई किती भारी सईबाई! प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडेचा शूटिंगदरम्यान फावल्या वेळात रंगला क्रिकेट सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---