---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे दोन जर्सी बनवण्यामागे आहे ‘खास’ कारण; आयसीसीची महत्वाची भूमिका

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 5:23 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघ टी२० विश्वचषकात दोन वेगवेगळ्या जर्सी घालणार असून यामागील कारणही आता उघड झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत खुलासा केला आहे. काळ्या आणि सोनेरी रंगाची जर्सी ही स्पर्धेसाठी तयार केलेली जर्सी होती, परंतु आयसीसीच्या असोसिएट देशांच्या काही संघांद्वारे अशीच जर्सी घातली जाते. म्हणून ऑस्ट्रेलिया संघाने काही सामन्यासाठी दुसरी जर्सी परिधान करण्याचा निर्णय घेतला.

खरं तर, टी२० स्पर्धा गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार होती आणि टी२० विश्वचषकाची जर्सी १२ महिन्यांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि आता साधारण वर्षभरानंतर या स्पर्धा होत आहेत.

मेलबर्न क्रिकेट मैदानापासून प्रेरित असिक्स किट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आवडली, पण आयसीसीच्या मते पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड आणि नामिबियाच्या संघांच्या जर्सीही त्या सारख्याच आहेत. अशा स्थितीत जर या संघांविरुद्ध सामना असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दुसरी जर्सी डिझाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयसीसीने ऑस्ट्रेलिया संघाला पर्यायी जर्सी घेऊन मैदानात उतरण्यास सांगितले आहे. असोसिएट देशांकडे नवीन जर्सी डिझाइन करण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१९ च्या वनडे विश्वचषकादरम्यान घातलेली जर्सी पर्यायी जर्सी म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीने ऑस्ट्रेलिया संघाला २३ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकातील सलामीच्या सामन्यादरम्यान पिवळी जर्सी घालायला सांगितले आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यासह उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघ त्यांच्या पसंतीची काळी आणि सोनेरी रंगाची जर्सी परिधान करेल.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सराव सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव केला. आता ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी (२० ऑक्टोबर) भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---