ऑकलँड। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(26 जानेवारी) दुसरा टी20 सामना इडन पार्क येथे पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात केएला राहुलने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
राहुलने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. राहुलचे हे न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेतील दुसरे अर्धशतक आहे. त्यामुळे त्याने न्यूझीलंडमध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2 अर्धशतके करण्याचाही पराक्रम केला आहे. न्यूझीलंडमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी भारताच्या कोणत्याही क्रिकेटपटूला न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2 अर्धशतके करता आली नव्हती.
राहुलव्यतिरिक्त न्यूझीलंडमध्ये भारताच्या श्रेयस अय्यर, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये प्रत्येकी 1 अर्धशतक केले आहे.
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 132 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 133 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17.3 षटकात 135 धावा करत सहज पार केले. राहुलला श्रेयस अय्यरने 44 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय क्रिकेटपटू –
2 – केएल राहुल
1 – श्रेयस अय्यर
1 – सुरेश रैना
1 – रोहित शर्मा
1 – युवराज सिंग
एमएस धोनीप्रमाणेच यष्टीरक्षक केएल राहुलनेही केला टी२०मध्ये मोठा पराक्रम
वाचा????https://t.co/ILAx2ZMC4p????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @klrahul11— Maha Sports (@Maha_Sports) January 26, 2020
सचिन, स्टीव्ह वॉने साजरा केला भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटरचा १००वा वाढदिवस; पहा व्हिडिओ…
वाचा- ????https://t.co/7ZYcFcveWX????#म #मराठी #Cricket @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) January 26, 2020






