---Advertisement---

T20WC2022 | ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! कर्णधार ऍरॉन फिंचला दुखापत

Aaron Finch
---Advertisement---

टी-20 विश्वचषकात सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली, पण प्रत्युत्तरात आयर्लंड संघाने देखील अपेक्षेपेक्षा चांगला खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 42 धावांनी जिंकला. परंतु त्यांचा कर्णधार ऍरॉन फिंच याला सामन्यादरम्यान दुखापत झाल्याचे समोर  येत आहे. 

ऑस्ट्रेलियन दिग्गज ऍरॉन फिंच (Aaron Finch) सोमवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. फिंचने या सामन्यात 44 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. या वादळी खेळीसाठी त्याला सामनावीर देकील निवडले गेले. संघाच्या विजयात फिंचची ही खेळी महत्वाची ठरली असली तरी, कर्णधाराला यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण या खेळीदरम्यान, शेवटच्या काही चेंडू खळताना फिंचला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. माहितीनुसार त्याचे स्नायू तानले गेले आहेत. विकेट्सच्या मध्ये धावताना त्याला त्रास होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

सामना जिंकल्यानंतर फिंच माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने स्वतः या दुखापतीविषयी सर्वांना माहिती दिली. तो म्हणाला की, “उद्या मी स्कॅन करण्यासाठी जाईल. आधीही मी यामुळे (पायाच्या स्नायूंमध्ये तान) त्रस्त राहिलो आहे. परिस्थिती सध्या जास्त खराब दिसत नाहीये. पण स्कॅनमध्ये काय येते हे, पाहावे लागेल.” यावेळी फिंचने संघातील इतर फलंदाजांचे देखील कौतुक केले. कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नसताना देखील ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा केल्या होत्या. दुखापतीमुळे फिंच आयर्लंडच्या फलंदाजीवेळी अर्ध्यातून पवेलीयनमध्ये परतला.

आयर्लंड संघाने 180 धावांचे लक्ष्य गाठताना सुरुवातील झटपट विकेट्स गमावल्या, पण नंतर लॉर्कन टकर (Lorcan Tucker) याने नाबाद 71 धावा कुटल्यामुळे त्यांचा संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचला. आयर्लंड संघ 18.1 षटकात 137 धावा करून सर्वबाद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर दयालच्या पदरात पडले ‘यश’! गुजरातला चॅम्पियन बनवणारा गोलंदाज टीम इंडियात
भर दो झोली मेरी! टीम इंडियात निवड न‌ झाल्याने पृथ्वी थेट साईबाबांच्या चरणी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---