भारतीय संघाला टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात भारतापुढे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. भारताला या टी-20 विश्वचषकात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कमी जाणवणार आहे. बुमराहच्या बदली खेळाडूच्या रूपात दिग्गज मोहम्मद शमी याला संघात सहभागी केले गेले आहे आणि त्याच्याकडून सर्वांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा देखील आहे. असे असले तरी, संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाच्या मते शमी संघातील बुमराहची कमी भरू काढू शकत नाही.
बीसीसीआयने जेव्हा टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित केला, तेव्हा मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असून त्याला 15 सदस्यांच्या मुख्या संघात सहभागी केले गेले होते. पण पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यापूर्वी बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत देखील तो दुखापतीच्या कारणास्तव खेळू शकला नाही. आता विश्वचषकात शमी बुमराहची कमी भरून काढेल असेल अनेकांना वाटत आहे. पण सुरेश रैना (Suresh Raina) या मताशी सहमत नाहीये. रैनाच्या मते शमी जरी गुणवंत फलंदाज असला तरी बुमराहची जागा भरू शकणार नाही.
जसप्रीत बुमराहची संघातील जागा घाणे शक्य नाही – सुरेश रैना
माध्यमांशी बोलत असताना सुरेश रैना म्हणाला की, “मोहम्मद शमीला मी बुमराहची परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणणार नाही. कारण तुम्ही जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांना रिप्लेस करू शकत नाही. संघाकडे जो सर्वोत्तम पर्यायी खेळाडू होता, त्याला निवडले गेले आहे. शमीने खूप चांगले प्रदर्शन केले आहे आणि तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे. बीसीसीआयने 15 दिवसांपूर्वीच संघाला ऑस्ट्रेलियासाठी रवाना करून खूप चांगले काम केले आहे. त्याठिकाणची मैदाने मोठी आहेत आणि मला वाटते संघाची जवळपास सर्व तयारी चांगली झाली आहे.”
दरम्यान, मोहम्मद शमी विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यापूर्वी सराव सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात एक षटक टाकले आणि या शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना सहा धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग: महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात; चार खेळाडू आणि मॅनेजर गंभीर जखमी
‘एकदा फोनवर चर्चा तरी करायची’, आशिया चषकावरील जय शाहांच्या वक्तव्यावर भडकला पाकिस्तानी दिग्गज