पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 33 धावांनी जिंकून टी-20 विश्वचषक 2022 मधील त्यांचे आव्हान कायम ठेवले आहे. गुरुवारी (3 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला गेला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करताना जबरदस्त प्रदर्शन केले. संघाने या सामन्यात सोपा विजय मिळवला. पाकिस्तानसाठी मध्यक्रमातील फलंदाज इफ्तिकार अहमद याने अर्धशतकीय योगदान दिले. यादरम्यान त्याने सुपर 12 फेरीतील सर्वात मोठा षटकार देखील मारला.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना निर्णायक होता. कारण पाकिस्तान संघ या सामन्यात पराभूत झाला असता, तर त्यांच्या उपांत्य सामन्याच्या आशा मावळल्या असत्या. परंतु सामना जिंकल्यामुळे त्यांचा संघ उपांत्य सामन्याच्या शर्यतीत कायम आहे. पाकिस्तानसाठी या सामन्यात इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) आणि शादाब खान (Shadab Khan) यांनी अनुक्रमे 51 आणि 52 धावांची खेळी खेली. पाकिस्तानचे फलंदाज संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत, पण त्यानंतर इफ्तिखार आणि शादाबने 82 धावांची भागीदारी पार पाडली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका मात्र अवघ्या 108 धावांपर्यंत मजल मारू शकला. आफ्रिकेच्याही एकून 9 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या.
पाकिस्तानसाठी या सामन्यात अर्धशतक करताना इफ्तिखारच्या बॅटमधून तब्बल 106 मीटर लांब षटकार मारला. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एंगिडी (Lungi Ngidi) याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. पण इफ्तिखारने मात्र त्याच्याच गोलंदाजीवर हा नेत्रदीपक शॉट खेळला. इफ्तिखारचा हा षटकार टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 फेरीतील सर्वात मोठा षटकार ठरला आहे. तर पहिल्या फेरीसह विचार केला, तर हा दुसरा सर्वात मोठा षटकार ठरला आहे. पहिल्या फेरीत यूएई संघाचा जुनेद सिद्दीकी याने यावर्षीच्या विश्वचषकातील सर्वात मोठी षटकार मारला आहे, जो तब्बल 109 मीटर लांब गेला होता.
https://twitter.com/TheJaanIbraheem/status/1588178941726134272?s=20&t=1J_g33vAGS0FV3DUEW-vsg
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वोत लांब षटकार मारणारे 10 खेळाडू
जुनैद सिद्दीकी (यूएई) – 109 मीटर विरुद्ध श्रीलंका
इफ्तिखार अहमद (पाकिस्तान) – 106 मीटर विरुद्ध दक्षिण आफ्रीका
ओडियन स्मिथ (वेस्ट इंडीज) – 106 मीटर विरुद्ध आयर्लंड
डेविड मिलर (दक्षिण आफ्रिका) – 104 मीटर विरुद्ध भारत
रोवमन पॉवेल (वेस्ट इंडीज) – 104 मीटर विरुद्ध जिम्बाब्वे
मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया) – 102 मीटर विरुद्ध आयरलैंड
ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) – 102 मीटर विरुद्ध न्यूझीलंड
माइकल जोन्स (स्कॉटलंड) – 98 मीटर विरुद्ध आयर्लंड
मार्कस स्टोइनिस (ऑस्ट्रेलिया) – 98 मीटर विरुद्ध श्रीलंका
लोर्कन टकर (आयर्लंड) – 98 मीटर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताकडून टी20 विश्वचषकात विराटच करतोय सर्वाधिक धावा; गंभीर, रैना अन् रोहितही मागेच
टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका पाकिस्तानविरुद्ध ‘चोकर्स’च, आकडेवारी चकित करणारी






