बुधवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड याठिकाणी आयोजित केला गेला. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा पहिला उपांत्य सामना असून दोन्ही संघांनी एकापेक्षा एक प्रदर्शन केले आहे. दोन्ही संघ या सामन्यात एकमेकांना कडवे आव्हान देतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (पदार्पण), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (पदार्पण), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 WC Semi-Final: मार्क वूड, डेविड मलान भारताविरुद्ध खेळणारच! खुद्द कॅप्टन बटलरने दिले संकेत
VIDEO: मोठी बातमी! हर्षल पटेलच्या चेंडूवर सराव करताना विराट कोहली जखमी, जाणून घ्या दुखापतीचे अपडेट