वेस्ट इंडीज संघाचा वरच्या फळीतील महत्वाचा फलंदाज शिमरन हेटमायर टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळू शकला नाही. हेटमायरच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडीज संघाने निराशाजनक प्रदर्शन केले आणि संघ सुपर 12 फेरीमध्येही स्थान मिळवू शकला नाही. संघाच्या या निराशाजनक खेळीनंतर चाहते हेटमायरला ट्रोल करू लागले आहेत. हेटमायरची पत्नी देखील चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. आता वेस्ट इंडीजचा वरच्या फळीतील हा फलंदाज स्वतःच्या पत्नीची पाठराखन करण्यासाठी पुढे आला आहे.
वेस्ट इंडीज (West Indies) संघ नेहमीच मैदानातील धमाकेदार खेळीसाठी ओळखला गेला आहे. पण टी-20 विश्वचषक 2022 मध्ये परिस्थिती पूर्णपणे उलटी दिसली. वेस्ट इंडीज संघाचे प्रदर्शन अपेक्षित राहिले नाही आणि परिणामी त्यांना सुपर 12 फेरीत देखील जागा मिळाली नाहीये. पहिल्या फेरीत ग्रुप बीमध्ये वेस्ट इंडीज पहिल्या दोन संघांमध्ये जागा पक्की करू शकला नाही आणि संघाचा विश्वचषकातील प्रवास इथेच संपला. चाहते संघाच्या या खराब प्रदर्शनासाठी शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) याला जबाबदारी धरत आहेत. हेटमाकयर त्याच्या वैयक्तिक कारणास्तव विश्चचषक स्पर्धेत खेळू शकला नव्हता.
हेटमायर विश्वचषकात न खेळण्यामागे चाहते त्याच्या पत्नीला कारणीभूत ठरवत आहेत. सोशल मीडियावर चाहते हेटमायरसोबतच त्याच्या पत्नीला देखील ट्रोल करत आहेत. हेटमायर मात्र सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगमुळे खूपच नाराज आहे. त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून नाराजी व्यकत केली. यावेळी त्याने “मला समजत नाही मी जे केले, त्यासाठी माझ्या पत्नीवर कशामुळे निशाणा साधला जात आहे?,” असा प्रश्न उपस्थित केला.
वेस्ट इंडीज संघ टी-20 विश्वचषकासाठी काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, पण हेटमायर संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी निघाला नाही. त्याने कौटुंबी कराण असल्यामुळे संघासोबत येऊ शकलो नाही, असे सांगितले होते. त्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने हेटमायरला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची दुसरी संधी देखील दिली होती. पण त्याने दुसऱ्या वेळी देखील फ्लईट मीस केली. अशात विश्वचषक खेळण्यासाठी त्याचे सर्व मार्ग बंद झाले. संघ व्यवस्थापनाने देखील त्याला विश्वचषक संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन
श्रीलंकेचे सिंह विश्वचषकातही दहाडले! आयर्लंडला मात देत केली सुपर 12 मध्ये विजयी सुरुवात