प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री तापसी पन्नू ही आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. असे देखील म्हटले जाते की, ती चित्रपट निवडताना खूप काळजीपूर्वक निवडते. ती असेच चित्रपट करण्यासाठी होकार देते ज्यामध्ये तिला काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते. आता ती भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर ‘शाबास मिठू’ या चरित्रपटात प्रमुख भूमिका बजावताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटासाठी सराव करत असतानाचे तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
मिताली राज हिने भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच तिने फलंदाजीमध्ये देखील अनेक उच्चांक गाठले आहेत. तिचे पात्र साकारण्यासाठी तापसी नेट्समध्ये घाम गाळताना दिसून येत आहे. तिने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सराव करताना दिसत आहे.
थप्पड आणि मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीने यापूर्वी कधीही क्रिकेट खेळले नाही. त्यामुळे ती खूप जास्त मेहनत घेत आहे. तिने कव्हर ड्राईव्ह खेळताना एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला होता. ज्यावर तिने कॅप्शन म्हणून ‘कव्हर ड्राईव्ह खेळण्याच्या प्रयत्न’ असे लिहिले होते.
https://www.instagram.com/p/CMobtYbJqju/
https://www.instagram.com/p/CMrFRzCpxaO/
यापूर्वी देखील तिने सराव करत असतानाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर तिने कॅप्शन म्हणून लिहिले होते. तिने लिहिले होते की, “लोकं तुमच्यावर दगड फेकतील पण तुम्ही त्या दगडांना मैलाच्या दगडात रूपांतरित करा.”
https://www.instagram.com/p/CMmNdJJp5rS/
तापसीने यापूर्वी महिला सबलीकरणाचा मुद्द्यावरून अनेक चित्रपट केले आहेत. यात ‘पिंक’ आणि ‘थप्पड’ सारख्या महिलांच्या सन्मानासाठी संदेश देणाऱ्या चित्रपटांचा देखील समावेश आहे. तसेच या चित्रपटात देखील ती मितालीची हुबेहूब भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कोर्ट हे माझ्यासाठी मंदिर-मशिदीसारखे…’ शमीची पत्नी हसीन जहां यांच्या पोस्टने उडाली खळबळ
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज: इंडिया लिजेंड्सला ऐतिहासिक विजेतेपद, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत
इंग्लंड विरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाला फायदा; टी२० क्रमवारीत ‘या’ क्रमांकावर विराजमान