टी20 विश्वचषक 2024 संपून आता दोन महिने झाले आहेत. परंतु सोशल मीडियावर बरेच चाहते अजूनही सूर्यकुमार यादवच्या झेलबद्दल वाद घालत असतात. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सी यानं सूर्याच्या कॅचची खिल्ली उडवली, ज्यानंतर त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
आम्ही तुम्हाला सांगतो की, टी20 विश्वचषक फायनलच्या अंतिम षटकात सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर शानदार झेल घेतला होता. या झेलमुळे भारताचा सामन्यात कमबॅक झाला होता. मात्र तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक यूजर्स या कॅचबाबत वाद निर्माण करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवर टिप्पणी करताना तबरेझ शम्सीनं लिहिले, “विश्वचषक फायनलमध्ये झेल तपासण्यासाठी हीच पद्धत अवलंबली असती, तर कदाचित नॉटआऊट दिलं गेलं असते.” शम्सी येथे सूर्यकुमार यादवच्या त्याच झेलबद्दल बोलत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये क्रिकेट खेळणारे काही लोक सीमारेषेवरील झेल तपासण्यासाठी दोरीचा वापर करताना दिसत आहेत.
या कमेंटमुळे तबरेज शम्सीला चाहत्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. यानंतर काही वेळाने त्यानं याबाबत स्पष्टीकरण दिलं. तबरेज शम्सी यानं 29 ऑगस्ट रोजी दुपारी 4.50 वाजता ही कमेंट केली. टीका झाल्यानंतर अर्ध्या तासानं त्यानं दुसरी पोस्ट केली. शम्सीनं या पोस्टमध्ये लिहिलं की, “जर काही लोकांना समजत नसेल की हा विनोद आहे, तर मी तुम्हाला 4 वर्षाच्या मुलाप्रमाणे समजावून सांगतो…हा एक विनोद आहे.”
If they used this method to check the catch in the world cup final maybe it would have been given not out 😅 https://t.co/JNtrdF77Q0
— Tabraiz Shamsi (@shamsi90) August 29, 2024
भारताने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. यासह टीम इंडियानं 2013 नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धा जिंकली. भारताचा हा दुसरा टी20 विश्वचषक आहे. टीम इंडियानं 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता.
हेही वाचा –
चाहत्यांसाठी वाईट काळ, एका आठवड्यात तब्बल 5 खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा!
विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लोळायला लागली, महिला खेळाडूचं हे कसलं अनोखं सेलिब्रेशन!
यूएस ओपनमध्ये खूप मोठा उलटफेर! दिग्गज कार्लोस अल्कारेज बिगरमानंकित खेळाडूकडून पराभूत होऊन बाहेर