दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहीर आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज झाला आहे. या हंगामासाठी भारतात येण्यापूर्वी ताहीरने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचे तोंडभरुन कौतुक केले. धोनी जगातील सर्वात्तम व्यक्ती आहे व त्याच्यासोबत खेळणे मी भाग्याचे समजतो.
धोनीचे केले तोंडभरून कौतुक
गेली तीन वर्षे चेन्नईसाठी खेळत असलेल्या ताहीरने भारतातील एका अग्रगण्य क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत धोनीचे कौतुक केले. तो म्हणाला, “ही भाग्याची गोष्ट आहे की, धोनी तुमच्यासोबत आहे. तो मला एक महान व्यक्ती वाटतो. तो प्रत्येकाला समजून घेत असतो. त्याच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखे असते. त्याला कोणतीही गोष्ट सांगावी लागत नाही. त्याला कोणकोणत्या क्षेत्रात चांगले आहे, हे पक्के माहीत असते.”
ताहीरने पुढे म्हटले, “मी मागील तीन वर्षापासून चेन्नई संघाचा भाग आहे. मला पुढेही चेन्नई संघाचा भाग बनून राहिला आवडेल. मागील वर्षाचे अपयश विसरून येणाऱ्या हंगामासाठी आम्ही सज्ज आहोत. यावेळी ५०० टक्के योगदान देण्याचा सर्वांचा प्रयत्न असेल.सर्व खेळाडू मेहनत घेत आहेत. येणारा हंगाम नक्कीच मनासारखा होईल.”
चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो ताहीर
पाकिस्तानी वंशाचा मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा इम्रान ताहीर २०१९ विश्वचषकानंतर एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. परंतु, आंतरराष्ट्रीय व व्यवसायिक टी२० क्रिकेट खेळणे त्याने सुरु ठेवले होते. आयपीएलमध्ये ताहीर एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधीत्व करतो. तो मागील तीन वर्षापासून चेन्नई संघाचा भाग आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी देखील या ४२ वर्षीय खेळाडूला चेन्नई व्यवस्थापनाने संघात कायम केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
PAK vs SA : दिग्गज खेळाडूंना वगळत नवोदितांना संधी, टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
जो रुट व्यतिरिक्त इंग्लंडचे हे ४ खेळाडू देखील ठरू शकतात भारतीय संघासाठी डोकेदुखी
इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीसाठी टीम इंडियात निवड झालेले ३ महाराष्ट्रीयन खेळाडू





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा