इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ४०वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादला गुजरातविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. सामना जरी गुजरात संघाने विजय मिळवला असला, तरीही सामनावीर पुरस्काराने हैदराबादच्या उमरान मलिकला गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या कामगिरीनंतर भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकरांनी उमरानला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील करण्याचा सल्ला दिला आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) खेळत असलेला जम्मू- काश्मीरचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) बुधवारी (दि. २८ एप्रिल) शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना फक्त २५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याचे हे प्रदर्शन संघाच्या कामी आले नाही. कारण राशिद खानने (Rashid Khan) (११ चेंडूत ३१) धावा चोपल्या आणि राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) (२१ चेंडूत ४०) शेवटच्या ४ षटकात ५६ धावा मारत गुजरातला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. गुजरातने शेवटच्या ६ षटकात २२ धावा कुटल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) सामन्यानंतर बोलताना म्हणाले की, “मला वाटते त्याचे (उमरान मलिकची) पुढचे आव्हान भारतीय संघ आहे. त्याला कदाचित शेवटच्या षटकात खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण, भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव आहेत. कदाचित त्यामुळे त्याला संधी मिळणार नाही.”
“मात्र, संघासोबत फक्त प्रवास केल्याने रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंसोबत प्रवास केल्याने आणि त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्याने पाहूया त्याच्यावर काय परिणाम होतो,” असेही पुढे बोलताना गावसकर म्हणाले.
या युवा वेगवान गोलंदाजाने संपूर्ण डावादरम्यान ताशी १५० किमीहून अधिक वेगाने गोलंदाजी केली. ८ सामन्यात आतापर्यंत १५.९३च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. उमरानने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त ११ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ७.९८च्या इकॉनॉमी रेटने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करत असलेल्या शशांकची घातक बॉलर फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅट्रिक
बिग ब्रेकिंग! इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार
दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा