रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकही सामना न गमावता आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताने साखळी फेरीतील 9 सामने आणि 1 उपांत्य सामना असे एकूण 10 सामने जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा पहिला बहुमान मिळवला. आता रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. मात्र, यापूर्वी सोशल मीडियावर रोहित शर्मा याच्यासी संबंधित एक खास फोटो व्हायरल होत आहे.
शाळेतील अभ्यासक्रमात रोहितवर धडा
खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो शाळेतील मुलांच्या जीके (जनरल नॉलेज) पुस्तकातील आहे. या पुस्तकात रोहित शर्मा याच्यावर पूर्ण धडा (Chapter on Rohit Sharma) आहे. या धड्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या संघर्षाच्या दिवसांपासून ते त्याच्या खास विक्रमांपर्यंत सांगण्यात आले आहे. यामुळे लहान मुले रोहितला पाहून शिकतील. अशात भारतीय कर्णधाराशी संबंधित फोटो विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी व्हायरल होत आहे. कारण, रोहितने सध्या एक खरा लीडर असल्याचे सर्वोत्तम उदाहरण जगापुढे ठेवले आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1725436356934115761?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725436356934115761%7Ctwgr%5E9e606007593f48476916f079984b505b2694e17a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ftalented-young-batsman-chapter-on-rohit-sharma-part-of-school-syllabus-picture-goes-viral-on-social-media-132458
भारतात आयोजित वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत रोहित शर्मा याने नि:स्वार्थी क्रिकेट खेळून आपल्या संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित एका नव्या भूमिकेत दिसला, ज्यात त्याने मैदानावर उतरताच आक्रमक फलंदाजी केली आहे, जेणेकरून त्याच्यानंतर फलंदाजीला येणाऱ्या खेळाडूंना कोणत्याही दबावाशिवाय खेळता येईल. रोहित यादरम्यान आपल्या विक्रमांविषयी अजिबात विचार करताना दिसला नाही. त्याच्या याच गोष्टीने सर्वांची मने जिंकली आहेत. फक्त चाहतेच नाही, तर भारताचे माजी दिग्गज आणि जगभरातील क्रिकेटपटूही रोहितच्या दृष्टीकोनाचे कौतुक करत आहेत.
रोहित शर्माची कामगिरी
रोहित शर्मा याची वैयक्तिक कामगिरी पाहायची झाली, तर त्याने आतापर्यंत 10 सामन्यात फलंदाजी करताना 55च्या सरासरीने 550 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 131 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे. अशात चाहत्यांना अपेक्षा आहे की, रोहित शर्मा अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी करून संघाला तिसऱ्यांदा वनडे विश्वचषकाचा किताब जिंकून देईल. (talented young batsman chapter on rohit sharma part of school syllabus photo viral on social media before cwc 2023 final)
हेही वाचा-
CWC 23 Final: क्या बात! अतिशय थाटामाटात झाले अहमदाबादमध्ये टीम इंडियाचे स्वागत, पाहा व्हिडिओ
World Cup 2023: Finalपूर्वी मोहम्मद शमीवर बंदी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्याच