पुणे। क्रिडा व सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा कार्यालय पुणे व पुणे स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या तर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा विभागात अंतिम फतानिया आहुजा, अर्णव नाडकर्णी, कियान लॉयर, श्रुती माने, होवरा भानपुरवाला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
वेस्टीन हॉटेल येथील प्रो स्क्वॅश अकादमीच्या स्क्वॅश कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सेंट मेरी स्कुलच्या तानिया आहुजा हिने रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिरच्या जान्हवी इंगळेचा 11-8, 11-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मुलांच्या गटात दिल्ली पब्लिक स्कुलच्या अर्णव नाडकर्णी याने सेंट मेरी स्कुलच्या विवान रांकाचा 11-7, 11-9 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
17वर्षाखालील मुलांच्या गटात सेंट मेरी स्कुलच्या कियान लॉयर याने विखे पाटील मेमोरियल स्कुलच्या प्रियांक शिधयेचा 11-5, 11-7 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. तर मुलींच्या गटात विबग्योर हायस्कुलच्या होवरा भानपुरवाला रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिरच्या गौरी साबळेचा 11-3 ,11-0 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
19वर्षाखालील मुलींच्या गटात सिम्बायोसिस कॉलेज वाणिज्य व कला विद्यालयाच्या श्रुती माने हिने रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिरच्या सुप्रिया फडकेचा 11-1, 11-2 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष कालिदास मगर, पुणे स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव आनंद लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रो स्क्वॅश अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पोतदार, माधव बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
14 वर्षाखालील मुली: तानिया आहुजा(सेंट मेरी स्कुल)वि.वि.जान्हवी इंगळे(रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिर) 11-8, 11-6;
14 वर्षाखालील मुले: अर्णव नाडकर्णी(दिल्ली पब्लिक स्कुल) वि.वि.विवान रांका(सेंट मेरी स्कुल) 11-7, 11-9;
17वर्षाखालील मुले: कियान लॉयर(सेंट मेरी स्कुल)वि.वि.प्रियांक शिधये(विखे पाटील मेमोरियल स्कुल) 11-5, 11-7;
17वर्षाखालील मुली: होवरा भानपुरवाला(विबग्योर हायस्कुल)वि.वि.गौरी साबळे(रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिर)11-3 ,11-0;
19 वर्षाखालील मुली: श्रुती माने(सिम्बायोसिस कॉलेज वाणिज्य व कला विद्यालय) वि.वि.सुप्रिया फडके(रावसाहेब पटवर्धन विद्या मंदिर)11-1, 11-2.