---Advertisement---

फायनलमध्ये १९२ धावा करुनही चेन्नईसाठी कोलकाताची ‘ही’ आकडेवारी ठरु शकते चिंताजनक

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 9:46 PM
MS Dhoni and Eoin Morgan
---Advertisement---

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या आहेत. असे असले तरी चेन्नई संघासाठी कोलकाताची एक आकडेवारी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यांच्या आजपर्यंतच्या इतिहासात केवळ दोन वेळा १८० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा कारनामा केला आहे. कोलकाताने २०१४ साली आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध २०० धावांचे लक्ष्य यशस्वी पार केले होते. तर त्यापूर्वी २०१२ साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच कोलकाताने १९१ धावांचे लक्ष्य यशस्वी पार केले होते.

कोलकातासाठी हा तिसरा अंतिम सामना आहे. त्यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये अंतिम सामना खेळला होता आणि विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही सामने जिंकले आहेत.

चेन्नईकडून डू प्लेसिसचे अर्धशतक
चेन्नईकडून सलामीला फलंदाजीसाठी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसने या सामन्यांत ५९ सामन्यांत ८६ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने ऋतुराज गायकवाडसह ६१ धावांची, रॉबिन उथप्पासह ६३ धावांची, तर मोईन अलीसह ६८ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईला १९२ धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

ऐकलंत का! गांगुलीचे पीसीबी अध्यक्षांना आयपीएल फायनल पाहण्यासाठी आमंत्रण, पण…

अविश्वसनीय! टी२० कर्णधार म्हणून धोनीचा ३०० वा सामना; पहिल्या सामन्यातील ‘हे’ सहकारीही मैदानावर

कडक! एकाच सामन्याच सीएसकेच्या खेळाडूंचं शतक, द्विशतक अन् त्रिशतक, पाहा नक्की काय केलाय पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---