आयपीएल २०२० हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. पण आता आगामी हंगामात चेन्नई संघ आपले चौथे जेतेपद मिळवण्यासाठी कसून सराव करत आहे. या हंगामात चेन्नई संघाने इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला ७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. काही दिवसांपूर्वी मोईन अलीच्या जर्सी वरील मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीचा लोगो काढून टाकल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. आता या चर्चेत प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी उडी घेत वादग्रस्त ट्विट केले आहे.
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली होती. या जर्सी वर एसएनजी १०००० या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीचा लोगो होता. त्यामुळे मोईन अलीने त्याच्या जर्सी वरून हा लोगो काढून टाकण्याची मागणी केली होती. अशी चर्चा रंगली होती. त्यांनतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले होते की मोईन अलीने लोगो काढून टाकण्याची मागणी केली नव्हती.
अशातच आता तस्लीमा नसरीन हिने वादग्रस्त ट्विट करत मोईन अलीवर निशाणा साधला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मोईन अली जर क्रिकेट खेळत नसता तर तो सीरियामध्ये जाऊन आयएसआयएस अतिरेकी बनला असता.”
तस्लीमा नसरीन यांच्या या ट्विटर ट्विटरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया या नकारात्मक आहेत.
https://twitter.com/taslimanasreen/status/1378823388928438273
कोण आहे तस्लीमा नसरीन?
तस्लीमा नसरीन या आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मुळच्या बांगलादेशच्या असलेल्या ५८ वर्षीय लेखिका मुख्यतः आपल्या लेखनामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखांमुळे त्यांना अनेकदा मुस्लिम समूदायकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना आपला देश सोडावा लागला होता. त्यांना स्विडेन देशाचे नागरिकत्व घ्यावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१: सर्वाधिक धावांसाठी ‘या’ चार खेळाडूंमध्ये रंगणार स्पर्धा, विराट आहे बराच पुढे
आयपीएलवरही झाला कोरोना इफेक्ट; बक्षीस रक्कमेत झाली ‘एवढी’ घट
बापरे! ‘या’ पाच खेळाडूंना आयपीएल दरम्यान जावे लागले होते तुरूंगात





