मुंबई । ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगने आपल्या देशाला दोनदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. पाँटिग एक उत्तम फलंदाजासोबत एक चांगला कर्णधारही होता. लहानपणापासूनच तो आपल्या फलंदाजीने गोलंदाजांची धुलाई करायचा. पॉटिंगमुळे तस्मानिया स्टेट स्कूलला क्रिकेटचे नियम बदलावे लागले होते आणि त्यावेळी हा फलंदाज अवघ्या नऊ वर्षांचा होता.
रिकी पाँटिंगने वयाच्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने 96 धावा केल्या होत्या. आपल्या खेळीने सामन्यात दाखवून दिले की तो एक लंबी रेसचा घोडा आहे. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये तो तिसर्या क्रमांकावर आहे.
संपूर्ण हंगामात रिकी पॉटींग बाद झाला नाही
वास्तविक, जेव्हा पाँटिग नऊ वर्षांचा होता तेव्हा संपूर्ण हंगामात तो बाद झाला नाही. यानंतर, तस्मानियामधील शाळेने एक नवीन नियम बनविला होता. त्यानुसार 30 धावा केल्यावर फलंदाजाला निवृत्ती घ्यावी लागे. पाँटिंगला फलंदाजी करायला आवडत होते, मग त्यावर पॉटींगने एक खास क्लुप्ती शोधली होती.
पाँटिंगमुळे नवीन नियमही मोडला
तो म्हणाला, ‘वयाच्या 9 व्या वर्षी मी शालेय क्रिकेटचा पहिला पूर्ण हंगाम बाद न होता खेळला. त्यानंतर पुढील वर्षी शाळेचे नियम बदलण्यात आले. नवीन नियमांनुसार 30 धावा केल्यावर निवृत्ती घ्यावी लागे. यानंतर त्याला यावर उपायही सापडला असल्याचे पाँटिंग यांनी सांगितले.
पॉन्टिंग म्हणाला, ‘मी षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर धावा करत नव्हतो. शेवटच्या चेंडूवर मी एक धाव घ्यायचो. अशाप्रकारे मी बरीच वेळ फलंदाजी करत असे पण धावा केल्या नाहीत. प्रत्येक वेळी नॉन-स्ट्रायकरला शेवटपर्यंत येऊन पंचाला माझा स्कोअर विचारायचो. 29 धावांच्या जवळ पोहोचल्यानंतर तो चौकार किंवा षटकार ठोकत असे.’