जगातील शेकडो क्रिकेटपटूंना एक मोठं व्यासपीठ मिळवून दिले आहे आणि जगभरातील क्रिकेटपटूंची आवडती स्पर्धा ही पाकिस्तान क्रिकेटपेक्षा कमी लोकप्रिय असल्याचा दावा तौसिफ़ अहमद यांनी केला आहे. तौसिफ़ अहमद हे पाकिस्तान क्रिकेटच्या निवड समितीवर आहे.
एक्सप्रेस ट्रिब्युनमध्ये आलेल्या बातमीनुसार तौसिफ़ अहमद म्हणाले “तो देश (भारत ) गेली सात- आठ वर्ष अश्या लीगचा आयोजन करत आहे. परंतु आम्ही फक्त दुसऱ्या मोसमात त्या देशाला मागे टाकले आहे. आमची लीग ही जबदस्त हिट झाली आहे हे सर्वांना माहित आहेच.”
“आमच्या ह्या लीगने आयपीएलला मोठा धोका निर्माण केला आहे. तसेच आयपीएलचे मोठे नुकसानही केले आहे. याचे सर्व श्रेय सर्वांना जाते. विशेषकरून पाकिस्तान क्रिकेट लीगचे चेअरमन नजाम सेठी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष शहयार खान यांना याचे श्रेय जाते.”