श्रीलंकेच्या यशस्वी दौर्यानंतर इंग्लंड संघाचे खेळाडू आज (२७ जानेवारी) भारतात दाखल झाले. कर्णधार जो रूटसमवेत श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिकेत खेळलेले सर्व खेळाडू चेन्नईला पोहोचले. दोन्ही देशांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळले जातील. श्रीलंका दौऱ्यावर न गेलेले इंग्लंडचे खेळाडू यापूर्वीच येथे दाखल झाले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होईल. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने सहा गडी राखून विजय मिळविला. त्याचबरोबर इंग्लंडने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची कामगिरी केली. भारतात दाखल झालेले खेळाडू पुढील सहा दिवस विलिनीकरणात राहतील. यानंतर, त्यांना सरावासाठी परवानगी देण्यात येईल.
असे झाले चेन्नईत स्वागत
श्रीलंकेमार्गे भारतात दाखल झालेल्या इंग्लंड संघाचे चेन्नई येथे हॉटेल कर्मचाऱ्यांनी नम्रतेने हात जोडत स्वागत केले. कोरोना आजारामुळे कर्मचाऱ्यांना खेळाडूंच्या संपर्कात येण्यास मज्जाव केला गेला आहे. इंग्लिश खेळाडूंच्या स्वागताचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटरवरून सार्वजनिक केला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ शेअर करत आगामी मालिकेसंबंधी माहिती दिली.
📍 Chennai, India@root66 and the team have arrived in India ahead of our four-match Test series 🇮🇳🏴 pic.twitter.com/GT06p9Ru4u
— England Cricket (@englandcricket) January 27, 2021
प्रमुख खेळाडू दाखल झाले चेन्नईमध्ये
श्रीलंका दौऱ्यावर न गेलेले बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर व रॉरी बर्न्स हे इंग्लिश खेळाडू मागील आठवड्यातच चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. या खेळाडूंचा सध्या विलगीकरण कालावधी सुरू आहे. भारतीय संघात खेळत असलेले मुंबईकर खेळाडू देखील चेन्नईत पोहोचल्याचे कळतेय. यामध्ये भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर रोहित शर्मा व अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. हे खेळाडू मंगळवारी उशिरा चेन्नईत दाखल झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील या स्थानी कायम
वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह, मुकणार या स्पर्धेला
IND vs ENG : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे चेन्नईत दाखल, इतके दिवसांसाठी असतील क्वारंटाईन